नवी दिल्ली :भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( Telecom Regulatory Authority of India ) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह व्हाउचर ऑफर करावे लागतील असे सोमवारी ( voucher validity of 30 days ) सांगितले .मात्र, यातून प्रत्यक्षात ग्राहकांचा फायदा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने ( TRAI ) देशभरातील सर्व मोबाईल ग्राहकांना दिलासा देणारा नवीन आदेश जारी केला ( Mobile Recharge ) आहे. या आधी ट्रायने त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
एक नवा प्लॅन :"प्रत्येक दूरसंचार सेवा कंपनीने ( Telecom companies ) कमीत कमी एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर जारी (Telecom companies offer voucher ) केले पाहिजे जे दर महिन्याच्या त्याच तारखेला संपतील. ज्या तारखेला त्याचा रिचार्ज केला होता. त्याची तारीख त्या महिन्यात उपलब्ध नसेल तर, ती पुढच्या महिन्याची पहिली तारीख असेल." असे दूरसंचार नियामकाने आदेशात म्हटले आहे.