नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे लोकसभा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. ओम बिर्ला यांनी गेल्या दोन वर्षात संसदीय लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या उपाययोजनाची सुरूवात केली. त्यामुळे अनेक ऐतिहासिक तसेच लोकाभिमुख विधेयके मंजूर झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सविस्तर वाचा..
यवतमाळ - झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरात गर्भवती वाघिणीची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी वनविभागाने रविवारी 5 आरोपींना अटक केली आहे. नागोराव भास्कर टेकाम, सोनु भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनु तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत. ही कारवाई पांढरकवडा वनविभाग आणि वणी पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. तसेच यापूर्वी मोरगाव वनपरीक्षेत्रातील वाघाच्या शिकार प्रकरणी अन्य तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत २ वाघांच्या शिकार प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
हैदराबाद - देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून राबवण्यात येत आहे. भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 50 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनासारख्या धोकादायक व्हायरससोबत लोकं लढत असताना हैदराबादमध्ये एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका नर्सने महिलेला दोन वेळा कोरोना लस टोचली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील हयातनगर मंडळाच्या कुंतलूर येथे हा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज (रविवार) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. सविस्तर वाचा..
पंढरपूर -राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बस सेवा दोन महिन्यापूर्वी बंद केली होती. त्यानंतर 1 जून रोजी एसटी बस सेवेला काही प्रमाणात शिथिलता देत सुरू करण्यात आली. पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी होणारी गर्दी ही मोठी आहे. त्यामुळे 17 एप्रिल पासून पंढरपूर एसटी बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती पंढरपूर आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सविस्तर वाचा..
वाशिम - स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत असताना केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर 14 मुलांचे, त्यातही ते अंध मुलांचे जन्म न देता वडील झाले आहेत. त्यांच्या पालन - पोषणासह शिक्षणाची जबाबादारी ते आवर्जून पार पाडत आहेत. सविस्तर वाचा..
बारामती- उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. आज (रविवार) त्यांचा विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार सुरू आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यापासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. परंतु मागील शनिवारपासून तो पुन्हा भरवण्यात येत आहे. अजित पवारांना भेटून गाऱ्हाणे मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मतदार संघातील नागरिकांना त्यांच्या विविध कामासाठी पुणे-मुंबईत भेटायला यावे लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः नागरिकांना भेटत असतात. सविस्तर वाचा..
मुंबई-कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता महागाईचा सामना करावा लागत आहेत. देशात दिवसेंदिवस इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. मार्च-एप्रिलमध्ये इंधन दरामध्ये जास्त दरवाढ झाली नाही. परंतु, जून महिन्यातील इंधनदरवाढीमुळे नागरिकांना चिंतेत टाकले आहे. इंधनदरवाढीच्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे. सविस्तर वाचा..
सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन वर्षांपूर्वी पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. घटनेत धनगड समाज असा शब्द आहे, तर महाराष्ट्रात धनगर समाज आहे. धनगड आणि धनगर या शब्दांचा बदलामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे. यावर धनगर आरक्षण कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारीसाठी येताना धनगर समाजाला आरक्षण देण्याचा आदेश पारित करून यावे, अन्यथा आषाढीवारीची शासकीय पूजा करू देणार नाही. असा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
कोलकता (पश्चिम बंगाल) - भाजपच्या ध्रुवीकरण राजकारणाने काँग्रसचे नुकसान केले आहे. मात्र, यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना निवडणुकींमध्ये विजयी होण्यास फायदा झाला, असे पश्चिमबंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालावर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. राजकीय परिस्थिती कॉंग्रेससाठी अनुकूलनव्हती आणि राज्यातील अल्पसंख्यांक समाजाने जातीयवादी शक्ती नष्ट करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसची निवड केली. सविस्तर वाचा..