- नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली, तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच हा दौरा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
- बुलडाणा -वाहन चालकांकडून हप्ता वसूल करणाऱ्या अंढेरा पोलीस स्टेशच्या वाहतूक पोलिसाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. राजू चौधरी असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. वाहन चालकांकडून हप्ता घेत असल्याचा राजू चौधरी याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रसिद्ध केली होती. दरम्यान या बातमीची दखल घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी या हफ्तेखोर पोलिसावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याची बुलडाण्यातील मुख्यालयात रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी देऊळगावराजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे हे करत आहेत. सविस्तर वाचा..
- मुंबई -राज्यात मंगळवारी (दि. 15 जून) नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद झाली असून 388 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत रुग्णांची संख्या मंगळवारी 1 हजार 200ने वाढली आहे. राज्यात एकूण 59 लाख 24 हजार 773 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे.सविस्तर वाचा..
- रत्नागिरी -ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे. ते मंगळवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. भानुदास माळी सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सविस्तर वाचा..
- नवी मुंबई-शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील ते प्रमुख आरोपी आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा परिमंडळ-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी, त्यांच्या पनवेल येथील आस्वाद निवासस्थानावरून त्यांना अटक केली आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई- बीडीडी चाळीचा रखडलेला पुर्नविकास मार्गी लावण्यासाठी आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आज त्यांनी ना.म.जोशी मार्ग येथील रहिवाशांची भेट घेत चर्चा केली. यावेळी रहिवाशांच्या दोन मुख्य मागण्या मान्य केल्याची माहिती अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनाचा एकत्रित संघ, अध्यक्ष यांनी दिली आहे. रहिवाशांशी करार करण्याच्या आणि 1996 पूर्वीच्या पुराव्याची गरज नसल्याच्या या दोन मागण्या आहेत. तर या मागण्यांसंबंधीचा अध्यादेश 15 दिवसांत काढू असे आश्वासन आव्हाड यांनी यावेळी दिल्याचेही वाघमारे यांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - अंमली पदार्थ तस्करीचे जाळे देशाच्या अनेक भागात पसरले आहे. याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम एनसीबी करत आहे. अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान एनसीबीने मुंबईसह ठाण्यातील अनेक भागात छापेमारी केली. काश्मीरमधून मुंबईत आणलेले 17.50 किलो चरस जप्त करण्यात आले. याची किंमत 9 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आहे.सविस्तर वाचा..
- नवी मुंबई-शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील ते प्रमुख आरोपी आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा परिमंडळ-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी, त्यांच्या पनवेल येथील आस्वाद निवासस्थानावरून त्यांना अटक केली आहे. सविस्तर वाचा..
- पाटना -एकीकडे लोकजनशक्ती पार्टीच्या 6 पैकी 5 खासदारांनी पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून पशूपती कुमार यांची नेतेपदी निवड केली. तसेच चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले. तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली, तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच हा दौरा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM
Last Updated : Jun 16, 2021, 2:22 PM IST