- मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातील निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. राज्यातील पॉझिटीव्हीटी रेट किती आहे, यावर ही आखणी करण्यात आली आहे . राज्य सरकारने नव्याने आकडेवारी जाहीर केली असून यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक १५. ८५ एवढा दर्शवण्यात आला आहे . कोल्हापूरपाठोपाठ रत्नागिरी - १४. २ , रायगड १३. ३ आणि पुण्याचा पॉझिटीव्हीटी रेट ११. ११ दर्शवण्यात आला आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट गोंदिया जिल्ह्याचा ०.८७ टक्के आहे. वाचा सविस्तर
- बुलडाणा- जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी काळी-पिवळी चालकाकडून हफ्ता वसूल करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हप्ता वसुली करणाऱ्या पोलिसाचे राजू चौधरी, असल्याचे समजते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे हफ्ता वसुलीला वरिष्ठांचा अभय असल्याची चर्चाही होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे बुलडाणा पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. वाचा सविस्तर
- कोल्हापूर -नुकतेच माओवादी संघटनेने एक पत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध व्हा, तुमच्या संघटीत शक्तीला ते राजकारणाकरीता वापरत आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या या पत्रकानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही पत्रक काढून सर्वच नक्षलवादी संघटनांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत आवाहन केले होते. याबाबत विचारले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता, सर्वच नक्षलवादी संघटनांना यापूर्वीच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्यास आवाहन केले होते, अशी प्रतिक्रिया दिली. आजपर्यंत जेवढेही राज्यकर्ते झाले आहेत, त्या सर्वांनीच नक्षलवाद्यांना मुख्यप्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. शिवाय सर्वच नक्षलवाद्यांनी देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून समोर यावे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. वाचा सविस्तर
- मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले त्यावेळी धारावीतही रुग्ण वाढू लागले होते. धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसात येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज तर धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा तर गेल्या वर्षभरात धारावीत सातव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाना पटोले असतील का? पाहा काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.. वाचा सविस्तर
- मुंबई - अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच लागली आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडल आहे. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केले पाहिजे, अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली, ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर
- कोल्हापूर - मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू छत्रपती यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांनी ही माहिती दिली. तब्बल पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई -दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्याने अनेक शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांसमोर एक अनोखे आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांनी सेल्फी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. याशिवाय शिक्षकांनी दंड भरून लोकल प्रवास करत शाळा गाठली आहे. वाचा सविस्तर
- अमरावती -कोरोनामुळे दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता या दोन्ही इयत्तांचे निकाल कधी आणि कशा पद्धतीने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर निकालसंदर्भात शिक्षण विभागाकडून तज्ञांची एक कमिटी नेमण्यात येणार आहे. या संदर्भातील मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
- बंगळूरू- हरहुन्नरी युवा कन्नड अभिनेता संचारी विजय याला अखेर मृत घोषित करण्यात आले आहे. शनिवार १२ तारखेला त्याला मोटरसायकलवरुन घरी परतत असताना भीषण अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केल्यानंतर कन्नडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोकलहर पसरली आहे.वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
Last Updated : Jun 14, 2021, 10:34 PM IST