मुंबई -राज्यात आज15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 57 लाख 46 हजार 892 इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 53 लाख 95 हजार 370 इतकी झाली आहे. तसेच राज्यात गेल्या 24 तासांत 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. सविस्तर वाचा..
नागपूर - केवळ काही महिन्यांच्या स्वतःच्या मुलाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. अंबाझरी पोलिसांनी त्या आईवर कलम ३२३ भादंवि सहकलम ७५ जुव्हेनाईल जस्टीस ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. एवढंच नाही तर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला सूचनापत्र देण्यात आले आहे. पोलिसांकडून अल्पवयीन पीडित बालकाच्या सुरक्षेसाठी बालकास बाल न्याय मंडळासमक्ष हजर करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा..
हैदराबाद -विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी) जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर भागातील भागाला भेट देणार आहेत. वादळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली : २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. आज (सोमवार) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ४ टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली होती. सविस्तर वाचा..
ठाणे -गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू असताना मी शिवसेनेत असल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच नव्हते, असा थेट प्रहार भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही राणे यांनी ठाण्यात बोलताना केली. सविस्तर वाचा..
कोल्हापूर - जिल्ह्यातील नागणवाडी, आंबेओहळ, सर्फनाला आणि धामणी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील राधानगरी, कागल तसेच आजरा विभागातील लघु-मध्यम प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सविस्तर वाचा..
बारामती - पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे उर्फ चिकू पाटील यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातानी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. ३१) रोजी सायंकाळी माळेगावमध्ये घडली. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने आण करण्याचे काम बेस्टकडून केले जातेय. अशा बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक हे पद गेली ५० दिवस रिक्त असल्याने बेस्टच्या दैनंदिन व धोरणात्मक कामाचे निर्णय होत नाहीत. ही गंभीर बाब निदर्शनास आणून देत भाजपाने बेस्ट समितीच्या बैठकीत आज सभा तहकूबीची सुचना मांडली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर सभा तहकुबीची सूचना फेटाळून लावल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या निषेधार्थ भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.सविस्तर वाचा..
मुंबई -योगगुरू स्वामी रामदेव आणि आयएमए यांच्यात वाद वाढतच असल्याचे दिसत आहे. आयएमएने रामदेव बाबांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. तर रामदेव बाबाही माघार घेत नसून दररोज या प्रकरणात नवीन घडामोड होत आहे. यातच अभिनेता अक्षय कुमारने अप्रत्यक्षरित्या रामदेव बाबांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसते. सविस्तर वाचा..
अमरावती :आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये एका व्यक्तीसोबत अजब प्रकार घडला आहे. कोर्लागुंटा येथे राहणारा हा व्यक्ती, बेवारस कोरोना मृतांना माती द्यायला गेला होता. यावेळी त्याच्यासमोर त्याच्याच आईचा मृतदेह आला. यामुळे स्थानिक रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सविस्तर वाचा..
सविस्तर बातम्यांसाठी येथे क्लिक करा..