महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM

By

Published : May 25, 2021, 6:51 AM IST

Updated : May 25, 2021, 1:53 PM IST

  1. सातारा : कोविडने जिल्ह्यात हाहाकार माजवला असताना अद्यापी लोकांमध्ये विनामास्क फिरण्याची बेफीकीरी दिसून येते. अशा ३० हजार १०९ बेजबाबदार नागरीकांवर पोलिसांनी जिल्ह्यात केसेस करुन गेल्या तीन महिन्यात तब्बल ८१ लाख ४७ हजार ६०० दंड वसुल केला. ४ हजार ४०९ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. तर विनाकारण फिरणारे व ई पास चे उल्लंघन करणा-यांकडून १९ लाख २० हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला. सविस्तर वाचा..
  2. मुंबई -राज्यात आज (दि. 24 मे) 22 हजार 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा 56 लाख 2 हजार 19 वर पोहोचला आहे. तर आज (सोमवार)361 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 42 हजार 320 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 जणांनी कोरोनावर मात केली आहे.सविस्तर वाचा..
  3. मुंबई - 'तौक्ते चक्रीवादळानंतर आज आठवडा उलटून गेला, तरीही राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी. अन्यथा कोकणवासीय नागरिक म्हणून मी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार आहे', असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तसेच भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शिवसेनेची सामाजिक बांधिलकी कुठे आहे?', असा सवालही दरेकरांनी केला आहे.सविस्तर वाचा..
  4. मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आज राज्याच्या शिक्षण सचिवांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली. सविस्तर वाचा..
  5. मुंबई- तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या पी 305 बार्जवर बचाव व मदत कार्य अजूनही सुरू आहे. या बचाव कार्यादरम्यान पी 305 बार्जवर व टग वरप्रदा या दोन ठिकाणाहून आतापर्यंत 188 जणांचे प्राण वाचविण्यात आले असून 70 जणांचे शव नौदलाच्या हाती लागलेले आहेत. यातील 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी आढळून आले आहेत. तर आणखी 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुजरातमधील वलसाड येथे मिळून आले आहेत. सविस्तर वाचा..
  6. मुंबई -राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना दीड हजार रुपयांचे आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार परिवहन विभागाने रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरु केले होते. मात्र, परिवहन विभागाचा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचण आल्याने अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे हजारो रिक्षा चालकांचा हिरमोड झाला आहे. सविस्तर वाचा..
  7. मुंबई -मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडून आलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. मात्र त्या आधी आज अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी विरोधकांवर टीका केली. बैठकीत सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ज्या सवलती मराठा समाजातील मुलांना मिळत आहेत, त्या चालू ठेवण्याबद्दल चर्चा झाली.सविस्तर वाचा..
  8. मुंबई - 'तौक्ते चक्रीवादळानंतर आज आठवडा उलटून गेला, तरीही राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी. अन्यथा कोकणवासीय नागरिक म्हणून मी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार आहे', असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तसेच भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शिवसेनेची सामाजिक बांधिलकी कुठे आहे?', असा सवालही दरेकरांनी केला आहे. सविस्तर वाचा..
  9. नवी दिल्ली -देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. दुसऱ्या कोरोना लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे म्हटलं जात असून ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात होते. यावर आज एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक नसल्याचे सांगितले. सविस्तर वाचा..
  10. नवी दिल्ली -देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा आहे. ही विदारक परिस्थिती कोरोनाचे अनियंत्रित चित्र दर्शवत आहे. कोरोनावर अटकाव घालण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. मात्र, देशात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्रावर टीका करत आहेत. आज त्यांनी पुन्हा टि्वट करत लसीकरणाद्वारेच कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यासाठी राज्यांना लसी पुरवणे गरजेचे आहे. मात्र, एवढी साधी गोष्ट केंद्राच्या लक्षात येत नाही, असे म्हटलं. सविस्तर वाचा..
Last Updated : May 25, 2021, 1:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details