- मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरामध्ये 29 हजार 177 रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा...
- रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (21 मे) कोकण दौऱ्यावर आले होते. सकाळी रत्नागिरीत विमानाने आगमन झाल्यावर विमानतळावरच त्यांनी नुकसानीचा आढावा एका बैठकीत घेतला. त्यानंतर ते लगेचच सिंधुदुर्गकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावरून रत्नागिरीतीलही काही स्थानिक नुकसानग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा...
- पणजी (गोवा)- कोरोनाच्या आजारामुळे गोवा सरकारने दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा रविवारी (दि. 23 मे) केली. येत्या दोन दिवसांत बारावीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (दि. 23 मे) केली आहे. सविस्तर वाचा...
- रत्नागिरी -नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे आता लोकांचेही मत झालेले आहे. यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राजापूरातील तुळसुंदे गावात नाना पटोले आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाणारला नानाच न्याय देऊ शकेल, असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा...
- कोरोनाच्या या संकटात आता म्यूकरमायकोसिसची रुग्ण वाढत आहेत. खासगी व सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढत आहे. सूरतच्या नेत्रतज्ज्ञ सर्जनची प्रकृती अधिकच बिकट झाली आहे. ईटीव्ही भारत्या प्रतिनिधींनी सूरत येथील शल्य चिकित्सक, डॉ.प्रियता सेठ, डॉ. सौरिन गांधी आणि डॉ. दिशांत शाह यांच्याशी सद्य परिस्थितीबद्दल चर्चा केली. हे डॉक्टर दिवसेंदिवस म्यूकरमायकोसिस रुग्णाच्या मेंदूत पोहोचू नये यासाठी उपचार करीत आहेत. सूरतमध्ये असे तीनच डॉक्टर आहेत. ज्यांनी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. सविस्तर वाचा...
- सिंधुदुर्ग- तौक्ते चक्रीवादळात कोकणातील झालेले नुकसान पाहता येथील लोकांच्या दुःखाचे निराकरण करता यावे म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे पंतप्रधान नुकसानीची पाहणी करताना विमानातून जमिनीवरही उतरले नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः लोकांशी संवाद साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी बेंबीच्या देडापासून राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापनाचे पैसे केंद्राकडून आणले तर त्यांना शाबासी देऊ, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांना लगावला. सविस्तर वाचा...
- मुंबई -पुढील तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- नवी दिल्ली -अॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेत थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयालकडे दाद मागितली. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. रामदेव बाबा यांचे विधान निराशाजनक होते. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, असे हर्षवर्धन म्हणाले. सविस्तर वाचा...
- मुंबई - मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना पंतप्रधान नेहमी परचा आणि मास्क वापरतात. मात्र, त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ भावून होण्याचा कार्यक्रम हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही. तसेच परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले, यावर जनता प्रश्न करत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. सविस्तर वाचा...
- मुंबई -मुंबईतगेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट होत आहे. आज 1431 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1470 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या
Last Updated : May 23, 2021, 10:59 PM IST