महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

By

Published : May 20, 2021, 6:59 AM IST

Updated : May 20, 2021, 11:05 AM IST

  1. मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या बार्ज पी३०५ वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत बार्जवरील 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.सविस्तर वाचा..
  2. मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वांना इशारा देण्यात आला होता. मग हा इशारा गांभीर्याने घेत ओएनजीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना बार्जवरुन परत का नाही आणले? असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. या वादळामुळे 'बार्ज पी३०५'वरील ३७ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सविस्तर वाचा..
  3. नागपूर - म्युकरमायकोसिस आजारावरील औषध महागडे असल्याने गरीब रुग्णांना ती परवडणारी नाहीत, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुक्यर-मायकोसिसवर आवश्यक उपचारावरील औषध अल्प दरात रुग्णांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारने विचार करावा, त्याकरिता एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सविस्तर वाचा..
  4. मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाय योजना संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीमध्ये राज्यातील लसीकरणाला गती देण्याबाबतही चर्चा होणार आहे. सविस्तर वाचा..
  5. जयपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. बुधवारी उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सविस्तर वाचा..
  6. मुंबई- राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कमपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. सविस्तर वाचा..
  7. सिंधुदुर्ग - जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाने 8 कोटी 73 लाख रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करून ती रक्कम शासनाकडे मागणी केली. मात्र प्रशासनाने मागितलेली रक्कमही मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची आणि पालकमंत्र्यांची कुवत असेल तर पंचनामे करण्यापेक्षा जिल्ह्यात निधी आणून दाखवावा, असे थेट आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिले आहे. सविस्तर वाचा..
  8. नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने डीएपी खतावरील अनुदान प्रति बॅग 500 रूपयावरून 1200 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. 2400 ऐवजी डीएपी खताची गोणी 1200 मध्ये शेतकऱयांना उपलब्ध होईल. सरकार त्यावर 14,775 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सविस्तर वाचा..
  9. नांदेड - मृत रुग्णावर सलग चार दिवस उपचार सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात घडला आहे. शहरातील गोदावरी रुग्णालयामध्ये ही घटना घडली असून न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या रुग्णालय प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
  10. मुंबई -राज्यात बुधवारी(19 मे) 34 हजार 031 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 594 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी 51 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 49 लाख 78 हजार 937 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी‌, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सविस्तर वाचा..
Last Updated : May 20, 2021, 11:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details