- मुंबई- पोलीस खात्याचे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांची नागपूर येथील निवासस्थानी तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग संदर्भातील गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा..
- पुणे- मराठा आरक्षणावरुण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा..
- औरंगाबाद- एका राजकीय पक्षाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याबद्दल खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. अशी मागणी सकल धनगर समाजच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
- अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच आता ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आली की काय अशी शंका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा..
- नागपूर- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर नागपुरात बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधीपक्ष नेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचल्याची टीका करत, त्यांना गुजरात आणि यूपीतील परिस्थिती दिसत नाही का? असा सवाल केला. सविस्तर वाचा..
- मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपालांना भेटणार आहेत. या भेटीत ते राज्यपालांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा करावी अशी विनंती मुख्यमंत्री राज्यपालांना करणार असल्याचे समजते आहे. सविस्तर वाचा..
- श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वैलू आणि कोकेरनाग भागामध्ये लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - शहरात कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता करण्यासाठी जागतिक पातळीवर लसींची खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लसींची चाचपणी करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा..
- मुंबई- सोनू जलाल या बुकीकडून परमबीर सिंग, राजकुमार कोथमिरे, प्रदीप शर्मा यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सोनू जलाल याच्या सांगण्यानुसार परमबीर सिंग, राजकुमार कोथमिरे, प्रदीप शर्मा यांनी त्यांच्याकडून 3 कोटी 45 लाख रुपयांची वसूली केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणताही एफआयआर दाखल करण्यात आली नाही. यामुळे आता सोनू जलाल यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी केली आहे. सविस्तर वाचा..
- जेरुसलेम : गेल्या काही दिवसांपासन इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढला आहे. यातच सोमवारी इस्राईलने गाझा पट्ट्यामध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये नऊ लहान मुलांचा समावेश होता, असे सूत्रांकडून समजले आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
Last Updated : May 11, 2021, 1:01 PM IST