- मुंबई : मनोराच्या पुनर्बांधणीच्या निर्णयावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. या पुनर्बांधणीच्या कामावरून भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे काम फडणवीस सरकारच्याच काळात देण्यात आल्याचे सांगत सचिन सावंत यांनी भातखळकर यांच्यावर पलटवार केला आहे. सविस्तर वाचा..
- कराड (सातारा) - कोरोनासारख्या महामारीमध्ये विकासकामांच्या निधीवरून राजकारण करणार्या सत्ताधारी आघाडीच्या गटनेत्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाने पुराव्यासह पर्दाफाश केला आहे. सविस्तर वाचा..
- नाशिक : रेमडेसिवीरच्या दोन इंजेक्शन्सची काळ्या बाजारात तब्बल 48 हजार रुपयांना विक्री करताना नाशिकच्या अंबड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 4 हजारांचे एक इंजेक्शन 24 हजार रुपयांना हे दोघे विकणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
- बीजींग :चीनचे अनियंत्रित रॉकेट लोकवस्ती असलेल्या भागात कोसळण्याची भीती जगभरातून व्यक्त केली जात होती. मात्र, हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळल्यामुळे मोठे संकट टळले आहे. चीनच्या अंतराळ अभियांत्रिकी विभागाने (सीएमएसईओ) याबाबत माहिती दिली. सविस्तर वाचा..
- मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या तीन तक्रारींप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गोपनीय चौकशी करण्यात सुरवात केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.सविस्तर वाचा..
- अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण सध्या दाखल असून या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोठ्या वावरामुळे रुग्णालय डॉक्टर, नर्सेस यांना नियमित काम करणे अवघड झाले आहे. चिंतेची बाब म्हणजे नातेवाईक थेट आयसीयू मध्ये येत आमच्या रुग्णाला रेमेडिसीवर द्या, हे औषध का नाही दिले, रुग्ण दगावला तर तुमची तक्रार करू असा दबाव आणतात. त्यामुळे रुग्णालय कर्मचारी सध्या वैतागले आहेत. सविस्तर वाचा..
- हैदराबाद - भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत आहे. दररोज लाखांच्या घरात नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे देशभर चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल लॅन्सेट ने एका रिपोर्टमध्ये कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना व भारत सरकारच्या तयारीवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. सविस्तर वाचा..
- नागपूर - शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. शहराकरीता राज्य शासनाच्या कोट्यातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचच्या सुविधेकरीता एकूण 96 केंद्रामधून लसीकरण करण्यात येईल. हे लसीकरण आजपासून (रविवार 9 मे) सुरू होणार आहे. सविस्तर वाचा..
- ठाणे :लसीकरणात अधिक सुसूत्रता येण्यासाठी ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना दररोज वयोगटानुसार वेगवेगळ्या रंगाचे कुपन ठाण्यात दिले जाणार आहे. जेणेकरून कुपनचा पुन्हा वापर टाळून लसीकरणासाठी नागरिकांचा त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली- कोरोनाबाधितांना आरोग्य सेवा तातडीने मिळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णालयात दाखल होण्याकरिता कोरोनाबाधित असलेल्या रिपोर्टची यापुढे गरज लागणार नाही. एवढेच नव्हे तर कोणेतही वैध ओळखपत्र नसतानाही रुग्णालयात रुग्णांना दाखल होता येणार आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
Last Updated : May 9, 2021, 1:07 PM IST