महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

By

Published : May 7, 2021, 7:24 AM IST

Updated : May 7, 2021, 11:01 AM IST

  1. नांदेड : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयाचा निषेध करत नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. आसना पूल येथे टायर जाळत मराठा संघटनांनी रास्ता रोको केला. तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होतं. यामुळे नागपूर-हैदराबाद रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सविस्तर वाचा..
  2. श्रीरामपूर : कोरोना तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्वॅब स्टीकसह इतर तपासणीचे साहित्य योग्य विल्हेवाट न लावता प्रवरा नदीच्या प्रवाहानजिक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकर श्रीरामपुरातून समोर आला आहे. या स्वॅब स्टिक कुणी फेकल्या हे कळू शकले नसले तरी यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा..
  3. चेन्नई : द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच द्रमुकच्या ३४ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घतेली. यामध्ये १९ माजी मंत्र्यांचा समावेश आहे. तर १५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.सविस्तर वाचा..
  4. यवतमाळ - कोरोनाच्या काळात जिल्ह्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारणी केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पाच रुग्णालयांना आकारलेले अतिरिक्त बिल संबंधित रुग्णांना परत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा..
  5. रांची :झारखंडमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. मात्र, मोदींनी या फोन कॉलवर केवळ 'मन की बात' केली, अशी टीका सोरेन यांनी केली आहे. सविस्तर वाचा..
  6. संगमनेर (अहमदनगर) - कोरोना नियमांचे पालन करा, असे सांगणाऱ्या पोलिसांवरच जमावाने हल्ला करत बॅरिकेट्स तोडून, तंबू उखडून पोलिसांसह खासगी वाहनांवरही तुफान दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात घडला आहे. सविस्तर वाचा..
  7. जालना -दोन दिवसांपूर्वीच एका कोरोनाबाधित रुग्णाने सामान्य रुग्णालयातून पलायन केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी एका कोरोना रुग्णाने सामान्य रुग्णालयातून पलायन केले. या रुग्णाचा मृतदेह राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या समोरून जाणाऱ्या रेल्वे पटरीच्या पुलाखाली सापडला. सविस्तर वाचा..
  8. पुणे : रस्त्यावर लाठीकाठी खेळणाऱ्या 85 वर्षीय शांताबाई पवार या महिलेचा व्हिडिओ गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. परंतु या आजी आता पुन्हा एकदा रस्त्यावर लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवून पैसे मागताना दिसत आहेत. सविस्तर वाचा..
  9. ग्वाल्हेर -रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन येणार स्टेट प्लेन ग्वाल्हेर विमानतळावर अपघातग्रस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार हे स्टेट प्लेन रनवे वर उतरत असताना कोसळले. या अपघातात वैमानिक कॅप्टन सईद माजिद अख्तर, सह वैमानिक जय शंकर जयस्वाल आणि एक अन्य व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
  10. नागपूर : कर्करोगासारख्या दुर्धर आजारात एक किडनी निकामी झाल्यानंतरही या आजारावर मात करणाऱ्या नागपुरातील एका महिलेने कोरोनावरही यशस्वीरित्या मात केली आहे. मेघा भांदक्कर असे या दूर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या महिलेचे नाव असून कोरोनावर मात करण्याची त्यांची ही कहाणी इतरांसाठी नक्कीच धीर देणारी आहे. सविस्तर वाचा..
Last Updated : May 7, 2021, 11:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details