- ठाणे :युरेनियमची अवैध विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. नागपाडा पोलिसांनी पोलीस निरीक्षक भालेकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचत ही कारवाई केली. जिगर पंड्या (२७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. लसीकरणाला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिका नोंदणी करून लसीकरणाला येण्याचे आवाहन करते. मात्र तिथे गेल्यावर आपल्याला पुढे लस मिळेल की नाही, याची भीती असल्याने नागरिक लसीचा साठा आल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई -'कोरोना उपचारादरम्यान ऑक्सिजन तुटवड्याचे संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. कोरोनाशी लढण्यासाठी व तो नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा, असे मी सातत्याने सांगत आहे. जर महाराष्ट्र मॉडेलचा वापर केला नाही तर देशातला कोरोना नियंत्रणात येणार नाही,' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाची स्तुती ही विरोधकांना जोरदार चपराक असल्याचे राऊत म्हणाले. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली :पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती सध्या पश्चिम बंगालसाठी रवाना झाली आहे.सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) प्रमुख अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. सविस्तर वाचा..
- बुलडाणा - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजर केल्याप्रकरणी नांदुरा येथील गैबीनगर परिसरात धाड टाकून एलसीबीने तीन आरोपींना अटक केली. कोरोना काळात गैरफायदा घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुलडाणा एलसीबीच्या पथकाने बुधवारी छापा टाकला होता. सविस्तर वाचा..
- ठाणे :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे मृत्यच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असताना, ठाण्यातील खासगी रुग्णालयाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृत रुग्णांचे बिल न भरल्यामुले रुग्णालयाने नातेवाईकांना तब्बल 15 तास मृतदेह दिला नाही. नौपाडा भागातील प्रिस्टीन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान मुजम्मिल शेख या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या झालेल्या चौकशीमध्ये अभिनेता दालीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहील यास 56 ग्रॅम मेफेड्रोनसह अटक करण्यात आलेली आहे.सविस्तर वाचा..
- आष्टी (बीड) -तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे यांना बीड येथील चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी बेदम मारल्याच्या निषेधार्थ आष्टी तालुका आरोग्य संघटनेच्यावतीने आज (दि. 6 रोजी) कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील लसीकरणही खोळंबले आहे. सविस्तर वाचा..
- नाशिक- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला नकार दिल्याने राज्यभरातुन मराठा आरक्षणाबाबत सकारत्मक आणि नकारत्मक प्रतिक्रिया येत असताना, नाशिक मध्ये महंत सुधीरदास पुजारी याने मराठा आंदोलनातील एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यावर वादग्रस्त कमेंट केली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
Last Updated : May 6, 2021, 1:31 PM IST