- नवी दिल्ली/मुंबई -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज अंतिम निकाल जाहीर करत, हे आरक्षण रद्द केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायने निकाल जाहीर केला. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. सविस्तर वाचा..
- चेन्नई :तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला. रात्री १०.३०च्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर तीन तास ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला.सविस्तर वाचा..
- पुणे - बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. या खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतानाच तेथूनच काही अंतरावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणखी एका महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. या दोन्ही घटना फरासखाना पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा..
- अहमदनगर : महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण का होऊ शकले? ऑक्सिजन, रेमडेसिवीर सर्वात जास्त राज्याला मिळाली ही वस्तुस्थिती असताना आपले अपयश झाकण्यासाठी प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करणे योग्य नसल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली/मुंबई -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय आज अंतिम निकाल देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज सकाळी १०.३० च्या सुमारास मराठा आरक्षण प्रकरणी राखीव ठेवलेला निकाल सुनावणार आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई- राज्यात 36 पैकी सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच अन्य 25 जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढ झाली आहे. मात्र, लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सविस्तर वाचा..
- मुंबई -राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आज 65 हजार 934 रुग्ण कोरना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 41 लाख 7 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के एवढे झाले आहे. तर, दुसरीकडे राज्यात आज 51 हजार 880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकीकडे रुग्ण जरी बरे होत असले, तरी 24 तासांत 891 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत. सविस्तर वाचा..
- मुंबई-गुणवत्तेच्या आधारे मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राला न्याय मिळेल, याविषयी मी आशावादी असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावर मंत्री अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा..
- नागपूर - दररोज परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप समोर येत आहेत. माझ्या मागील तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप झालेला नाही, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सांगितलं. ते नागपुरात बोलत होते.सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानीत होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकावर कडक ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी ऑक्सिजन पुरवठा केला नाही, त्यांना अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजवावी, असे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सविस्तर वाचा..
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
Last Updated : May 5, 2021, 11:23 AM IST