महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर..

top ten news stories around the globe
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

By

Published : May 3, 2021, 7:17 AM IST

Updated : May 3, 2021, 1:08 PM IST

  1. मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या राज्य गुप्तवार्ता पथकाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. तपास यंत्रणांकडून अटकेची कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. सविस्तर वाचा..
  2. मुंबई :अदर पुनावाला यांना धमकी कुणी दिली याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. शिरच्छेद करण्याची धमकी देणारे कोण हे पुनावाला यांनी सांगावे, त्यांना फोन करणारा कुणी लहान माणूस नाही असेही पटोले मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सविस्तर वाचा..
  3. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघासाठी कोरोना काळातही तब्बल 99.78 टक्के इतके मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन्ही गटांचा उत्साह पाहायला मिळत होता. उद्या 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे. सविस्तर वाचा..
  4. नागपूर : हल्लीच्या युगात प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाईलमुळे अनेकांचे जीव जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. नागपुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल दिला नाही याचा राग आल्याने एका अल्पवयीन मुलीने थेट गळफास घेतल्याची घटना नागपुरात घडली आहे. सविस्तर वाचा..
  5. मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असल्याने लसीचा तुटवडा आहे. यामुळे पालिकेने ४५ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण बंद केले आहे. मात्र, त्याचवेळी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा..
  6. चेन्नई : एकीकडे केरळमध्ये सत्ताधारी पक्षाने सत्ता कायम राखून इतिहास रचला. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये द्रमुकने दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकला घरी बसवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांचा हा पहिलाच विजय आहे. सविस्तर वाचा..
  7. तिरुवअनंतपुरम : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या नेतृत्त्वाखाली लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ने केरळमध्ये इतिहास रचला आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच केरळमध्ये एका सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. हा विजयदेखील एलडीएफने थोड्याफार फरकाने नाही, तर यूडीएफचा धुव्वा उडवत मोठ्या फरकाने मिळवला आहे.सविस्तर वाचा..
  8. हिंगोली -जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असता, वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची गती पाहून जणू काय पावसाळाच सुरू झाला आहे याचाच अनुभव येत होता. सविस्तर वाचा..
  9. मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या सपशेल पराभवावरून सामनातून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. जखमी वाघिणीचा विजय या शीर्षकाखाली सामनामध्ये प्रकाशित अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालातून देशाने शिकायला हवे असे म्हटले आहे. सविस्तर वाचा..
  10. चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संच क्रमांक 8 आणि 9 मध्ये कोळसा घेऊन जाणारा कन्व्हेअर बेल्ट जळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. माहिती मिळेस्तोव आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या घटनेत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. सविस्तर वाचा..
Last Updated : May 3, 2021, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details