महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

edited photo
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 21, 2021, 10:47 PM IST

Updated : Mar 21, 2021, 10:53 PM IST

  1. मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 30 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे, आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा..
  2. मुंबई -मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 20 मार्चला शनिवारी 2 हजार 982 रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी आज तब्बल शहरात 3775 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
  3. नवी दिल्ली - सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांकडून महिन्याला पोलिसांना १०० कोटींची खंडणी वसुलीचे टार्गेट दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारकडून डॅमेज कंट्रोलची जबाबदारी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी उचलली आहे. सविस्तर वाचा..
  4. भोपाळ (मध्य प्रदेश) - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतरासह कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठीचा संकल्प करण्यासाठी मंगळवारी भोंगा वाजवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून मात्र टीका करण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
  5. कांठी दक्षिण (पश्चिम बंगाल) - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेले नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार सुवेन्दु अधिकारी यांचे वडील शिशीर अधिकारी अखेर आज भाजपमध्ये दाखल झाले. यावर मुख्यमंत्री ममता बँनर्जीं यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून मी मोठी गाढव आहे, अधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा ओळखू शकले नसल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा..
  6. मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी ही तक्रार मलबार हिल पोलिस ठाण्यात दाखल केली असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सविस्तर वाचा..
  7. ठाणे - मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांच्या कार प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीत सापडला. मनसुख हिरेन यांची हत्या प्रकरणात समावेश असलेल्या दोन आरोपींना एटीएस पथकाने बेड्या ठोकल्या. रविवारी सुट्टीच्या कोर्टात त्यांना नेले असता ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. सविस्तर वाचा..
  8. नागपूर- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी (दि. 20 मार्च) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे महिन्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सविस्तर वाचा..
  9. मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका ई-मेल द्वारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्या ईमेलमध्ये परमबीर सिंग हे यांनी लिहिले आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याकाठी शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, अशी धक्कादायक माहिती मला भेटलेली होती आणि त्याची कल्पना मी वरिष्ठांना दिलेली सुद्धा होती अस या ईमेलमध्ये परमबीर सिंग यांनी लिहिले आहे. त्यावरती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी टीका केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या सगळ्या प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा तर दिलाच पाहिजे परंतु मुख्यमंत्री कार्यालयाचे जवळचे नेते आणि मंत्री अनिल परब यांची सुद्धा या प्रकरणांमध्ये चौकशी केली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सविस्तर वृत्त..
  10. नवी दिल्ली- अँटिलीया प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राजकीय भूकंपही वाढत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर मोठे राजकीय चेहरे या प्रकरणाशी संबंधित असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? शिवसेनेचे मुख्यमंत्री की शरद पवार?, असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. सविस्तर वाचा..

अधिक बातम्यांसाठीयेथे क्लिककरा...

Last Updated : Mar 21, 2021, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details