- मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. राज्यात बुधवारी 23 हजार 179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 24 तासांत 84 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात मृत्युदर 2.24 टक्के इतका आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्याची चिंता वाढली आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज यामुळे व्यक्त होत आहे.
बापरे! राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त
- मुंबई- देशाच्या राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे आज 2, 377 रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 49 हजार 958 वर पोहचला आहे. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 547 वर पोहचला आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येचा चढता आलेख; आज 2377 नवे रुग्ण
- मुंबई -अँटिलिया प्रकरणात आता अनेक खुलासे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दबाव वाढताना दिसला होता. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस महासंचालक हेमंत नगराळेदेखील उपस्थित होते. यानंतर आज राज्याच्या गृहखात्याकडून मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेच दुसरीकडे अँटिलिया प्रकरणांत आजही अनेक घडामोडी घडल्या. याबाबतचा आढावा...
अँटिलिया प्रकरण : पीपीई कीटमध्ये सचिन वाझेच; काय घडले आज दिवसभरात?
- मुंबई - अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक आणि वाझे प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. एनआयए आणि एटीएस हे योग्यरित्या तपास करत आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हेमंत नगराळे यांनी आज(17 मार्च) मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.
स्फोटकं प्रकरणाचा तपास योग्य दिशेने, दोषींवर कारवाई होईल - मुंबई पोलीस आयुक्त
- मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. परमबीर सिंग यांची या पदावरून उचलबांगडी करून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
अंजनाबाई गावित तपास ते मुंबई दहशतवादी हल्ला, अशी आहे हेमंत नगराळेंची कारकिर्द
- दिल्ली : महाविकास आघाडी सरकार पत्रकारपरिषदेत सचिन वाझेंचा बचाव करत होते. याचा काय अर्थ आहे? हेदेखील तपास यंत्रणांना शोधावे लागेल. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह याची उचलबांगणी करण्यात आली. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.