महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - आजच्या ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

By

Published : Mar 1, 2021, 8:59 PM IST

Updated : Mar 1, 2021, 10:50 PM IST

  • नवी दिल्ली- मुंबईमधील वीजपुरवठा बंद पडण्यामागे चीनमधील हॅकर असल्याचे समोर येत असतानाच दुसरी धक्कादायक बाब समोर आली आहे. रशिया आणि चीनशी संबंधित असलेल्या हॅकरने गेल्या काही आठवड्यात कोरोना लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला लक्ष्य केले होते. ही माहिती सायबर गुप्तचर संघटना सायफर्मा कंपनीने अहवालात दिली आहे.

धक्कादायक! चिनी हॅकरकडून सीरमसह भारत बायोटेकवर सायबर हल्ला- अहवाल

  • मुंबई -12 ऑक्टोबर 2020 यादिवशी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अचानक वीज गेल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. मात्र, या ब्लॅक आउटमागे विशेष सायबर हल्ला झाल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

12 ऑक्टोबरच्या ब्लॅक आऊटमागे सायबर हल्ल्याची शक्यता - गृहमंत्री

  • मुंबई -राज्यात मागील 24 तासांत नव्या 6 हजार 397 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 30 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, सलग पाच दिवस राज्यातील रुग्णसंख्या 8 हजारांच्या घरात होती. मात्र, सहाव्या दिवशी आज (सोमवारी) ही रुग्णसंख्या कमी झाली आहे.

राज्यात नव्या 6 हजार 397 रुग्णांची नोंद, 24 तासांत 30 रुग्णांचा मृत्यू

  • मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरूवात झाली. अधीवेशनाचा पहीला दिवस वैधानिक महामंडळांच्या मुदतवाढीवरून गाजला. विरोधी पक्षाने वैधानिक महामंडळांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार सुधीर मुंगटीवार आक्रमक झाले होते. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आधी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची घोषना करा नंतरच वैधानिक महामंडळांच्या मुदत वाढीला मंजूरी देऊ, असे वक्तव्य केले.

वैधानिक विकास महामंडळांच्या मुदतवाढीवरून गाजला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस

  • मुंबई/ नवी दिल्ली -कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. लसीकरण केंद्रांवर ४५ ते ५९ वयोगटांतील व्याधीग्रस्त व्यक्ती तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आड पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आदिंसह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.

CORONA Vaccination : नरेंद्र मोदी, शरद पवारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी घेतली लस

  • मुंबई- लॉकडाऊनच्या काळात १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत अचानक वीज गेली होती. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती. दक्षिण मुंबईसारख्या विभागात वीज गेल्याने अनेक महत्त्वाच्या कार्यालयांच्या कामांत अडचण निर्माण झाली होती. तसेच रुग्णालयातील महत्वाची कामे रखडली होती. मात्र, ही वीज काही तांत्रिक अडचणीमुळे गेली नसून, चीनने सायबर हल्ला केल्याची माहिती आता समोर येत आहे. हा हल्ला करण्यामागे नेमके काय कारण होते? याचा उलगडा गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच करणार असल्याची माहिती उर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिली.

मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेला ब्लॅकआउट चीनमुळेच; सायबर हल्ला झाल्याचे उघड

  • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीमधील स्फोटकांची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली आहे, अशा प्रकरची व्हायरल पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. मात्र, या संदर्भात स्वतः जैश-उल-हिंद या संघटनेने समोर येऊन त्यांच्या संघटनेने मुकेश अंबानी यांना कुठलीही धमकी दिली नाही, असे स्पष्ट केले आहे.

अँटिलिया प्रकरण : अंबानी कुटुंबियांना जैश-उल-हिंदने धमकी दिली नाही; टेलीग्रामवर खुलासा

  • ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कल्याण पश्चिमच्या लाल चौकी परिसरात असलेल्या आर्ट गॅलरी येथे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका कोरोना बाधित महिलेवरच वॉर्डबॉयने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विकृत वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीकांत मोहिते असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी वार्डबॉयचे नाव आहे.

धक्कादायक : कोविड रुग्णालयात कोरोना बाधित महिलेशी अश्लील चाळे, वार्डबॉयवर गुन्हा दाखल

  • मुंबई- जॉन अब्राहम, दिशा पाटनी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचे शुटिंग मुंबईत सुरू झाले आहे. दिशा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुटिंग सुरू झाल्याचे घोषणा केली आहे.

"ऑल द बेस्ट व्हिलन" म्हणत टायगरने दिशा पाटनीला पाठवला संदेश

  • लंडन - सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने दिग्गज रॉजर फेडररच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्याने फेडररच्या एटीपी क्रमवारीत ३१० आठवड्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर राहण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गेल्या महिन्यात जोकोविचने आपले नववे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले. जोकोविचने आपल्या कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे. तो आता फेडरर आणि नदालच्या वैयक्तिक २० ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे.

सुसाट नोव्हाक...! जोकोविचची फेडररच्या विक्रमाची बरोबरी

Last Updated : Mar 1, 2021, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details