- पुणे- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या एक महिन्यांपासून सावंत आजारी होते.
सविस्तर वाचा -सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे दुःखद निधन
- जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ भीषण अपघात घडला आहे. पपईचा ट्रक उलटून 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्रीनंतर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर घडला. अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये 7 पुरुष, 6 महिला व 2 बालकांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा-जळगावमध्ये ट्रक उलटून 15 मजूर ठार; किनगावजवळ घडला भीषण अपघात
- पुणे- तीन वर्षांपासून देशभरात महामार्गांवर फास्टटॅग प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होतं. परंतु, प्रत्येक्षात महामार्गांवर आजपासून(सोमवार) फास्टटॅग लागू करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला असून फास्टटॅग नसणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
सविस्तर वाचा -पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक
- मुंबई - जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अनुभव घेतल्यानंतर आता पुन्हा फेब्रुवारीमध्येही हाच अनुभव घ्यायला लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार १६ ते १८ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी अवकाळी पाऊस होऊ शकतो. उद्या(मंगळवार) पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
- मुंबई : व्हॅलेंटाईन डे नंतर सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात चांगलीच तेजी बघायला मिळाली. सोमवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरूवात होताच शेअर बाजार 463 अंकांनी उसळून 52 हजारांच्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर पोहोचला. निफ्टीतही 126 अंकांची वाढ झाली. निफ्टीही 15,289 अंकांच्या पातळीवर पोहोचला.
सविस्तर वाचा -व्हॅलेंटाईन वीकनंतर शेअर बाजार जोरात! गाठला 52 हजारांचा टप्पा!
- पुणे - माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ'ला स्वराभिषेक; मंदिरावर केली फुलांची आरास व विद्युत रोषणाई
- मुंबई - शालेय शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात दोन शासन निर्णय काढले आहेत. मात्र, त्या शासन निर्णयाविरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची भूमिका शिक्षक समन्वयक संघटनेने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघातर्फे आज सकाळी आमदार निवास ते बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि हुतात्मा चौक येथून पदयात्रा काढण्यात आली आहे.