- बारामती -जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडणार आहे. या सोहळ्या प्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. युवराज यशवंतराव होळकर व खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सविस्तर वाचा-जेजुरीत शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे होणार अनावरण, पडळकरांच्या टीकेला पवार काय देणार उत्तर?
- चेन्नई -रोहित शर्माच्या द्विशतकी आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. वरच्या फळीचे तीन फलंदाज स्वस्तात गमावल्यानंतर रोहित आणि अजिंक्यने १६२ धावांची भागीदारी रचली. फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत १६१ धावा तडकावल्या. त्याच्या खेळीत १८ चौकार आणि २ चौकारांचा समावेश होता.
सविस्तर वाचा- IND vs ENG : पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाचे 'त्रिशतक'
- 'जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 आम्ही रद्द केले. याला 17 महिने झाले आहेत. आम्हाला विचारण्यात येत आहे की, हे या राज्याचा विशेष दर्जा रद्द करताना दिलेली आश्वासने आमच्या लक्षात आहेत का? आम्ही त्या आश्वासनांचे काय केले? आपण 17 महिन्यांच्या हिशेबाची मागणी करत आहात. आपण 70 वर्षांत काय केले, याचा हिशेब दाखवला काय? तुम्ही तुमचे काम योग्यरित्या केले काय? तर मग, आम्हालाही विचारण्याची गरज नाही,' असा सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केला.
सविस्तर वाचा- जम्मू-काश्मीरला आत्मनिर्भर राज्य बनवण्यासाठी आमचा प्रयत्न - गृहमंत्री
- मुंबई - गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास 13 वर्षापासून रखडला आहे. बिल्डरने सरकार-म्हाडा-रहिवासी यांना चुना लावत 1 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केला आहे. रहिवासी 13 वर्षे बेघर असून 5 वर्षांपासून भाडेही बंद आहे. अशात हा प्रकल्प म्हाडाकडे ताब्यात घेतला असून आता पुनर्विकास मार्गी लागेल अशी आशा रहिवाशांना होती. पण ही आशा खोटी ठरली आहे. आपल्या हक्काच्या घरासाठी आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
सविस्तर वाचा- पत्राचाळीतील रहिवासी म्हाडाविरोधात रस्त्यावर, हक्काच्या घरासाठी मंगळवारपासून साखळी उपोषण
- जळगाव -'बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर व तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांनी ३० दिवसांच्या आत पोलिसांना शरण यावे. अन्यथा, त्यांना या गुन्ह्यात फरार घोषित करण्यात येईल,' असे घोषणापत्र प्रसिद्ध करण्याचे आदेश पुणे विशेष न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, पुणे पोलिसांच्या पथकाने झंवर व कंडारे यांच्या घरांसह इतर ठिकाणी नोटिसा लावल्या आहेत.
सविस्तर वाचा-बीएचआर घोटाळा प्रकरण: सुनिल झंवर, जितेंद्र कंडारेंच्या घरांवर लावल्या नोटिसा
- मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद होती. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रिडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे सरकारने या विद्यार्थ्यांचे नुकसान न करता क्रिडा स्पर्धां अंतर्गत गुण विद्यार्थ्यांना सरसकट द्या, अशी मागणी भाजपा नेते अॅड आशिष शेलार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये केली आहे.