- मुंबई - नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. नाना पटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१२ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीने कॉंग्रेसला राज्यात बळ मिळणार असून पक्षसंघटना मजबूत होईल, असा विश्वास अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, जाणून घ्या राजकीय कारकीर्द
- मुंबई -महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चौफेर टिका केली आहे.
गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौफेर टिका
- बारामती -शासनाने कृषीपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी आणलेल्या ‘कृषीपंप धोरण-२०२०’ अंतर्गत कृषी योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरु आहे. कडेगाव विभागातील १९३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल ८२ लाख २२ हजार रुपये एकरकमी भरुन वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने ५० कोट्टींचा टप्पा गाठला आहे. एकीकडे वाढीव वीजबिलामुळे ग्राहकांनी बिले भरण्यास नकार दिला असताना व विरोधी पक्षांनी या मुद्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असताना बारामती परिमंडळाची बिल वसुली कौतुकास्पद आहे.
१९३ शेतकऱ्यांनी एकरकमी भरले ८२ लाखाचे वीजबिल.. बारामती परिमंडलाने गाठला ५० कोट्टींचा टप्पा
- नवी दिल्ली-देशभरात ७० लाख जणांकडे १ अब्ज डॉलरचे क्रिप्टोचलन आहे. यामध्ये वर्षभरात ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा क्रिप्टोचलनाबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्तवाचे विधेयक सादर करण्यात येणार आहे. या विधेयकाच्या निमित्ताने क्रिप्टोचलनाबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
जाणून घ्या, क्रिप्टोचलनाबाबत इत्यंभूत माहिती
- मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक महिन्यांपासून बंद असलेली विद्यालये, महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. शारीरिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आदी कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबरोबरच ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घातली आहे. यासंदर्भातील परिपत्रक उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे.
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू, सरकारकडून नवीन नियमावली जारी
- मुंबई - नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर नागपूरमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले होते. काल मुंबईत त्यांनी पत्रकारांशी बातचीत करुन काँग्रेसच्या उभारणीसाठी कार्यरत होणार असल्याचे सांगितले होते.