महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-ten-news-stories-around-the-globe
Top 10 @ 11 PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या!

By

Published : Jan 27, 2021, 3:24 PM IST

Updated : Jan 27, 2021, 10:59 PM IST

  • मुंबई - आज राज्यात 2 हजार 171 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 15 हजार 524 वर पोहचला आहे. तर, आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 894 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.26 टक्के, तर मृत्यूदर 2.53 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 2 हजार 171 नवीन कोरोना रुग्णांचे निदान; 32 रुग्णांचा मृत्यू

  • मुंबई -मुंबईमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे दहा महिन्यांपासून मुंबईची लोकल ट्रेन सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद आहे. मात्र आता मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान सामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू होऊ शकते, अशी शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.

1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार?

  • नवी दिल्ली - शेतकरी नेता व्ही. एम. सिंह यांच्या गटाने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि इतर शेतकरी नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच ज्यांनी आंदोलन कर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सक्त कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

शेतकरी आंदोलनात फूट, 'या' दोन शेतकरी संघटनांनी आंदोलन घेतलं मागे

  • मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही यावेळी उपस्थिती होती. सह्याद्री अतिथीगृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला.

सीमावाद सुटेपर्यंत कर्नाटकातील मराठी प्रदेश केंद्रशासित करा-उद्धव ठाकरे

  • नागपूर - अल्पवयीन मुलीच्या अवयवांना कपड्यांवरून स्पर्श केल्यास हे कृत्य पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार ठरणार नाही, तर फक्त विनयभंग ठरेल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आरोपीला निर्दोष सोडण्याच्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

'कपड्यांवरून स्पर्श लैंगिक अत्याचार ठरत नाही' नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

  • नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. साहित्य संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठाराव मांडण्याची मागणी सावरकर प्रेमींकडून केली जात आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्नची मागणी, साहित्य संमेलनात मुद्दा गाजणार?

  • मुंबई :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही यावेळी उपस्थिती होती. सह्याद्री अतिथीगृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प पुस्तकाचे प्रकाशन

  • नवी दिल्ली -प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर र‌ॅलीला अचानक हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावल्यानंतर वादंग सुरू झाले आहे. काही शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू नावाच्या व्यक्तींवर शेतकऱ्यांना फडकवण्याचा आरोप केला आहे. सोशल माध्यमांवर दीप सिद्धू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता सनी देओलसोबतेचे छायाचित्र व्हायरल झाले. यानंतर दीप सिद्धू कोण आहेत, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया...

शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दीप सिद्धू कोण ? वाचा सविस्तर...

  • नवी दिल्ली- टिकटॉकसह हॅलोची मालकी असलेल्या चिनी कंपनी बाईटडान्सने देशातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अ‌ॅपवरील बंदी कायम ठेवल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

टिकटॉक अखेर देशातून गुंडाळणार गाशा

  • मुंबई -नुकताच 'बाप'माणूस झालेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केरळ उच्च न्यायालयाने विराटला एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. एका ऑनलाईन रमी गेममुळे विराटला ही नोटीस आली असून या गेमचा तो सदिच्छादूत (ब्रँड अँबेसेडर) आहे.

केरळ उच्च न्यायालयाची विराटला कायदेशीर नोटीस

Last Updated : Jan 27, 2021, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details