- मुंबई - मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसकडून पत्रक प्रसिद्ध करून भाई जगताप यांच्याबरोबरच अन्य नियुक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड
- पंढरपूर(सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. तळसंगी तलावात आईसह दोन लहान मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असताना, तलावाच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतामध्ये आईसह दोन मुलीचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
तळसंगी तलावात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू; मंगळवेढ्यातील घटना
- नवी दिल्ली - देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतचं जपानच्या दुतवासाने E5 सीरीज शिनकानसे (E5 Series Shinkansen) अधिकृत छायात्रित जारी केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-अहमदाबादमधील अंतर फक्त 2 तासांमध्ये पूर्ण होईल. मुंबई-अहमदाबाद 508 किलोमीटरच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे.
...अशी दिसणार मुंबई-अमहमदाबाद बुलेट ट्रेन!
- नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक पार पडली. सोनियांच्या 10 जनपथवरील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत २० नेते उपस्थित होते. पक्षाला मजबूत करण्याबाबत या बैठकीत खल करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले, की पक्षातील २० नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत जवळपास पाच तासांपर्यंत वैठकीत चर्चा केली. पक्षाला मजबूत करण्यासंदर्भात सर्व नेत्यांनी आपली मते मांडली.
Congress Meeting : राहुल गांधी पुन्हा बनू शकतात काँग्रेस अध्यक्ष, म्हणाले, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारेन..
- नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते माधव गोविंद वैद्य यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यातून बरे झाल्यानंतर त्यांना मागील दोन दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. यामुळे त्यांना धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 97 वर्षांचे होते. उद्या सकाळी 9.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांचे नागपुरात निधन
- मुंबई -काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीत बिघडीची चिन्ह दिसत असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमानुसार कारभार करण्याची आठवण करून दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना 14 डिसेंबररोजी एक पत्र दिल असल्याचे ही सांगितले.
आघाडीत बिघाडी? सोनियांचे उद्धवना प्रथमच पत्र, कॉंग्रेस मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार
- मुंबई -राज्यात महाविकास आघाडी सरकारला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. सोनिया गांधी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, सोनिया गांधी या युपीएच्या प्रमुख आहेत. आणि महाराष्ट्रात सरकार बनवण्यात देखील त्यांचे योगदान आहे. कोरोनामुळे काही कामे थांबली होती. परंतु ते आता पुन्हा सुरू होतील आणि राज्य सरकार कॉमन मिनिमम कार्यक्रमानुसारच काम करणार आहे. त्यांच्या पत्राचे आम्ही स्वागत करतो.
महाविकास आघाडीत सोनियांचेही योगदान महत्त्वाचे; त्यांच्या सुचनेवर काम केले जाईल
- श्रीनगर: जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) घोटाळ्या प्रकरणात पीएमएलएअंतर्गत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची ११.८६ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली. संलग्न मालमत्तांमध्ये तीन निवासी घरे समाविष्ट आहेत. यामध्ये श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावरील घराचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांची ११.८६ कोटींची मालमत्ता जप्त
- मुंबई- 'शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. रावले यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी मुंबईत आणले जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर परळच्या शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कट्टर शिवसैनिक आणि माजी खासदार मोहन रावले यांचे निधन
- नवी दिल्ली: माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी जाहीर केले की ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) भारतीय पॅनोरामा विभागात 'सांड की आँख' आणि सुशांतसिंग राजपूत अभिनीत 'छिछोरे' यासह २० नॉन-फीचर आणि २३ फिचर फिल्म प्रदर्शित होतील.
इफ्फीमध्ये 'सांड की आँख', 'छिछोरे', मराठी 'प्रवास'सह ४३ चित्रपट
- अॅडलेड -गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टींचे योग्य मिश्रण करत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची 'पिंक बॉल' कसोटी आपल्या नावावर केली आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावांवर ढेपाळल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाना पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सलामीवीर मॅथ्यू वेड (३३) आणि मार्नस लाबुशेन (६) या फलंदाजांना गमावले. मात्र जो बर्न्सने ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला लवकर विजय मिळवून दिला. पहिल्या डावात नाबाद ७३ धावा आणि सामन्यात योग्य नेतृत्व करणाऱ्या टिम पेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकलेल्या २६ कसोटी सामन्यात भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.
भारताचा फक्त ३६ धावात धुरळा, ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय, हेझलवुड-कमिन्स ठरले नायक