महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 11 PM
रात्री अकराच्या ठळक बातम्या

By

Published : Nov 27, 2020, 1:06 PM IST

Updated : Nov 27, 2020, 11:02 PM IST

  • मुंबई -राज्यभरात आज राज्यात ६, १८५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८, ०८, ५५०वर पोहोचला आहे. राज्यात आज ८५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६, ८९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे.

सविस्तर वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ६, १८५ नवीन रुग्णांचे निदान, ८५ मृत्यू

  • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. कोरोना व्हायरसवरच्या लसनिर्मितीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली याची पाहणी ते करणार आहेत. त्यापूर्वी मोदी गुजरातला जातील. तेथील झायडस-कॅडिला प्लांटला भेट देतील. पुणे दौरा आटोपल्यावर मोदी हैदराबादला जाणार आहोत.

सविस्तर वाचा-अहमदाबाद-हैदराबाद-पुणे, असा असेल पंतप्रधान मोदींचा कोरोना व्हॅक्सिन दौरा

  • नवी दिल्ली - तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारने प्रयत्न केला. परंतु, शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलकांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, आता आंदोलकांना राजधानीत प्रवेश दिला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा-सत्याचा अहंकारावर विजय होतो, शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

  • चेन्नई - आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीला जाताना इंडिगो एअरलाईन्सच्या सहवैमानिकाला (कॉकपीट क्रू) सौम्य हृदयविकाराचा झटका आला. विमान लँडिंग होण्याच्या काही काळ आधी ही घटना घडली. मात्र, या कर्मचाऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले. इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सविस्तर वाचा-लँडिंग होण्याआधी विमानातील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका

  • जळगाव -डोंबाऱ्याच्या खेळात दोरीवरची मुलगी खाली पडू नये, म्हणून डोंबारी ढोलकी वाजवत राहतो. त्याच पद्धतीने राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने डोंबाऱ्याप्रमाणे ढोलकी वाजवत रहावं. आमचं सरकार पडणार नाही. ते पाच वर्षे चालत राहणार आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.

सविस्तर वाचा-भाजपने डोंबाऱ्याप्रमाणे ढोलकी वाजवत रहावं, आमचं सरकार पाच वर्षे चालणार - गुलाबराव पाटील

  • जळगाव- देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून जम्मू काश्मिरमध्ये सैन्य दलाच्या सेवेत तैनात असताना, जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र यश दिगंबर चव्हाण यांना गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आले. यश यांच्या अचानक जाण्याने पिंपळगाववासी शोकसागरात बुडाले आहेत. यश यांच्या हौताम्याची बातमी धडकल्यानंतर पिंपळगावातील एकाही घरात चूल पेटलेली नाही. सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हकनाक बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा केंद्र सरकारने कायमस्वरुपी बिमोड करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून हाेत आहे.

सविस्तर वाचा-यश देशमुख यांना हौतात्म्य आल्याने पिंपळगाव बुडाले शोकसागरात; गावात पेटली नाही एकही चूल!

  • हैदराबाद- कोरोना महामारीचा फटका बसलेली अर्थव्यवस्था काहीअंशी सावरत आहे. असे असले तरी जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत देशाच्या विकासदरात ७.५ टक्के घसरण झाली आहे. एप्रिल-जुनच्या तिमाहीत विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली होती.

सविस्तर वाचा-कोरोनाचा फटका: देशाच्या अर्थव्यवस्थेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत ७.५ टक्क्यांची घसरण

  • हिंगोली- या देशात सर्वच प्रकारच्या निवडणुका अतिशय शांततेत पार पडतात, त्यात तेवढे काही राजकारण होत नाही. मात्र सर्वात वाईट निवडणूक असेल तर ती आहे सरपंचपदाची, घराघरांमध्ये या पदासाठी प्रचंड गोंधळ होतो. त्यामुळे हेच सरपंच पद जनतेतून निवडून आणण्याचा अतीशय महत्वपूर्ण निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला होता. मात्र हे देखील या सरकरला अजिबात मान्य नाही. तसेही भाजप सरकारने घेतलेला कोणताच निर्णय या सरकारला पटत नसल्याने, त्यावर स्थगिती देण्याचा कारभार या आघाडी सरकारून केला जात असल्याची टीका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.

सविस्तर वाचा-सर्वात वाईट निवडणूक असेल तर ती सरपंच पदाची- पंकजा मुंडे

  • मुंबई - धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद अखेर आता उच्च न्यायालयात गेला आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांच्या शिफारशीनुसार धारावी पुनर्विकासाची तिसरी निविदा नुकतीच राज्य सरकारने रद्द करत नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आता निविदा सादर केलेल्या सेकलिंक कंपनीने न्यायालयात आव्हान दिल्याची माहिती कंपनीतील एका वरिष्ठाने 'ईटीव्ही भारत'ला दिली. निविदा रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी तीन दिवसांपूर्वी एका याचिकेद्वारे केल्याचेही त्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा-धारावी पुनर्विकासाचा वाद न्यायालयात; निविदा रद्द करण्याच्या निर्णयाला 'सेकलिंक कंपनी'चा विरोध

  • जालना - भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या जाधव कुटुंबातील तीन सख्या भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यभर वीज महामंडळाच्या विरोधात संताप व्यक्त झाला. तर अनेक राजकीय नेत्यांनी त्या तीन मृत भावांच्या कुटुंबींयांची भेट घेतली. त्याच प्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही आज सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी जाधव कुटुंबाला मदती मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकीर संघटना आंदोलन उभारणार असल्याचेही स्पष्ट केले.

सविस्तर वाचा-जाधव कुटुंबीयांच्या मदतीसाठी स्वाभिमानी आंदोलनाच्या पवित्र्यात; दिवसा वीज देण्याचीही मागणी

Last Updated : Nov 27, 2020, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details