- पाटणा -बिहार विधानसभा २०२० चे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर बिहार राज्य निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ मतदारसंघाचे आणि मध्यप्रदेशातील २८ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल उद्याच जाहीर होणार आहेत. त्या ठिकाणचीही मतमोजणीची तयारी प्रशानसाने पूर्ण केली आहे. एनडीएमध्ये भागीदार असलेल्या नितीश कुमार सत्ता राखण्यात यशस्वी होणारकी, धर्माचा नाही तर बेरोजगारीचा मुद्दा उचलून बिहार निवडणुकीला रंगतदार आणि चुरशीची करणाऱ्या महाआघाडीची सत्ता स्थापन होणार याचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.
बिहारचा सत्ताधीश कोण? उद्या होणार फैसला; मध्यप्रदेशचीही मतमोजणी
- नागपूर - शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होईल, असा शब्द आमच्या सरकारने दिला होता. त्यानुसार २ हजार २९७ कोटी ६ लाख रुपयांची मदत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. उर्वरित मदत ही दिवाळी नंतर दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मदतीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
शेतकऱ्यांना २ हजार २९७ कोटी रुपयांची मदत वितरित; विजय वडेट्टीवार यांचा दावा
- पुणे -शिरूर येथील न्हावरे गावात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडण्यात आले होते. मंगळवारी हा प्रकार घडला होता. यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तर यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज (सोमवारी) सायंकाळी 7 वाजता शिक्रापूर याठिकाणी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पत्रकार परिषद घेणार आहेत.
शिरुर प्रकरण : 6 दिवसांनंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या
- मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन काही तासात जमा होणार. थकीत दोन महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी जमा होणार. थकीत वेतन व विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आज राज्यभर कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याची दखल घेत आज एक महिन्याचा पगार व दिवाळीला मिळणारी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवाळीला दुसऱ्या महिन्याचा पगार देऊ, असे पत्रकार परिषद घेत सांगितले.
- मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून छापेमारी करण्यात आली. आता या संदर्भात अर्जुन रामपाल याला 'एनसीबी'कडून चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 11 नोव्हेंबर रोजी रामपाल याला सकाळी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अर्जुन रामपालला 'एनसीबी'चे समन्स; 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश
- जळगाव -थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याला त्यांनी ठाकरे सरकारला जबाबदार धरले. ही घटना आज सकाळी समोर आली आहे. मनोज अनिल चौधरी (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी होते.