Top News Today : दिवसभरात कोठे काय घडणार , वाचा एका क्लिकवर
आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )
मुंबई : देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today ) उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली येथे दुपारी शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सभा सुरु होईल. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत. याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तर संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.( Read Top News Today )
- बाळासाहेबांची शिवसेना गुवाहाटीत :आज सकाळी 26/11 च्या वीरांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीसाठी रवाना होतील. सकाळी 8 वाजता सगळे आमदार, खासदार विमानतळावर दाखल होतील. सकाळी 10.30 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानाने मुख्यमंत्री आमदार, खासदार, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी मुंबईहून उड्डाण करतील. 4 वाजता सगळे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाईल. संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे.
- 26/11 घटनेला 14 वर्षे पूर्ण, विविध कार्यक्रमांचे आयोजन : पोलीस आयुक्त कार्यालयात 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थिती राहून आदरांजली वाहणार आहेत, सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
- सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. संविधान सभेने 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानिमित्त हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचा प्रारंभ करतील. हा प्रकल्प न्यायालयांच्या आयसीटी अर्थात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरणाद्वारे याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.
- संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम :काँग्रेसतर्फे संविधान दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. तसेच पुणे येथे संविधान दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संविधान दौड आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होणार आहे.
- शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन :मुंबईत शिवसेनेकडून आयोजित रोजगार मेळाव्याला आदित्य ठाकरे, सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत. बोरिवली येथे सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
- इस्रो आज 8 नॅनो उपग्रह आणि ओशनसॅट-3 प्रक्षेपित करणार : आज इस्रोचं थर्ड जनरेशन ओशनसॅट 3 सह 8 नॅनो सॅटलाईट लॉन्च होणार आहेत. हे सॅटेलाईट सकाळी 11.46 वाजता लॉन्च केले जातील.
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण :दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी 376 दिवस केलेल्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने अहमदनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सकाळी 11 वाजता निदर्शने केली जाणार आहेत.