Top News Today : दिवसभरात कोठे काय घडणार , वाचा एका क्लिकवर - Top News Today In Marathi
आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )
मुंबई : देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today ) आधुनिक महाराष्ट्राचे जनक असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहेत. तसेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आज कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत.
- मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर : (Chief Minister on a visit to Satara today ) आज महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमधील प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाला चे उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर कोल्हापुरातल्या शिरोळला एक कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार आहेत.
- समर्थांच्या राम मूर्तीचा आजपासून पुनर्स्थापना सोहळा : जालना जिल्ह्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आज पुनर्स्थापना सोहळा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात या मूर्तींची चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मूर्ती हस्तगत केल्या. त्याचा आजपासून दोन दिवस पुनर्स्थापन सोहळा होणार आहे. आज राम मूर्तींची मिरवणूक निघणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर 26 नोव्हेंबरला राम मूर्तीची पुनर्स्थापना केली जाणार आहे.
- संजय राऊतांच्या संबंधित ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी :पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याचे सांगत ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
- नागपूरमध्ये अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन :नागपूरमध्ये आज ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, नितीन गडकरी आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांच्या हस्ते होणार आहे.
- नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर :विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत.( Neelam Gorhe on Buldhana district tour ) दुपारी 12 वाजता विविध विषयांवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या मैदानाची पाहणी करतील.
- नवनीत राणांच्या वॉरंटवर सुनावणी :बनावट जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप असलेल्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात बजावलेल्या वॉरंटवर शिवडी कोर्टात आज सुनावणी करण्यात येणार आहे. राणा यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.