आजच्यामहत्त्वाच्या बातम्यांचा आढावा :
आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता(Rain Update Today) - आज म्हणजेच 16 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच 17 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यात, तर 18 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण(PM Modi inaugurated 75 digital banking units today)- आज सकाळी ळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे (डीबीयू ) लोकार्पण करणार आहेत. डिजीटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावेत आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात समाविष्ट होतील, असा डीबीयूची स्थापनेचा उद्देश आहे.
अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर (Amiit Shah currently Bhopal Visit) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमातून याचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ते वैदकीय शिक्षणाचा हिंदी भाषेतून शुभारंभ करणार आहे. भारतामध्ये मेडिकल शिक्षण पहिल्यांदाच हिंदीमधून होणार आहे.