Top News Today : दिवसभरात कोठे काय घडणार वाचा, एका क्लिकवर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 23 तारखेपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. अशाच महत्त्वाच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )
मुंबई :कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 23 तारखेपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.( Prohibition in Kolhapur from today ) कर्नाटक सरकारच्या विरोधातील आंदोलन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच श्रद्धा वालकरच्या हत्याकांडानंतर ( Shraddha Walker murder case ) आज पहिल्यांदाच तिचे वडील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तसेच आज दिवसभरातील देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )
- पंतप्रधान मोदींची खासदारांशी चर्चा :आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांच्या खासदारांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्ये यावर भाजप खासदार गाऱ्हाणे मांडणार असल्याची माहिती आहे.
- कोल्हापूरात आजपासून जमावबंदी :कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. आजपासून म्हणजे 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
- सुरेखा पुणेकर यांची पत्रकार परिषद :आखाती देशात यंदा प्रथमच लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दुबईमध्ये पहिल्यांदाच होणार्या लावणी महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ( Surekha Punekar ) यांची पत्रकार परिषद होणार आहे.
- विजयकुमार गावित यवतमाळ दौऱ्यावर :आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित 9 आणि 10 डिसेंबरला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 3 वाजता मारेगाव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह इमारत उद्घाटन आणि शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह इमारत भूमीपूजन कार्यक्रम, दुपारी 4 वाजता बोटोणी एकलव्य मॉडेल शाळेचे भूमिपूजन करणार आहेत. अशा विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
- श्रद्धाचो वडील मांडणार भूमिका :श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आज पहिल्यांदाच तिचे वडील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.