मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याची तक्रार पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे अॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी केली आहे
मुंबईत चार मजली इमारत कोसळली.. ९ जणांना ढिगाऱ्याखालून काढले
मुंबई -शहरातल्या बांद्रा भागातील ए के मार्ग, बेहराम नगर, रजा मस्जिद जवळ एक चार मजली बांधकाम असलेले घर कोसळले आहे. दुपारी ४ च्या दरम्यान हे बांधकाम कोसळले असून, ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ९ जणांना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज वेरूळ अजिंठा लेणीची पाहणी करणार
औरंगाबाद - राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. (Tourist Spots Will Reopen) गुरुवारी ते वेरूळ अजिंठा लेणी परिसराची पाहणी करणार आहेत. लेणी परिसरात असणाऱ्या अडचणी बाबत अनेक वेळा तक्रारी आहेत. त्यामुळे त्या प्रत्यक्ष जाऊन पाहणार असून पाण्याची आणि विजेच्या समस्येबाबत जाणून घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
कोल्हापूरचे पालकमंत्रीसतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, आज दिवसभरात त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी भेट दिली होती.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंविरोधात मुंबईत एफआयआर दाखल