नवी दिल्ली -कोरोना महामारीविरोधात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात आजपासून सुरू होत आहे. देशात आत्तापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर १ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील ३००६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.
वाचा सविस्तर -COVID VACCINATION LIVE UPDATES: देशभरात आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात
हैदराबाद - देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात आजपासून होत आहे. भारतीय बनावटीच्या दोन लसींना सरकारने आणीबाणीच्या वापरासाठी परवाना दिला आहे. सीरम कंपनीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला हा परवाना मिळाला आहे. भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि भारतीय विषाणू संस्थेशी (एनआयव्ही) सहकार्य करत लस तयार केली आहे.
वाचा सविस्तर -जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास
मुंबई -मागील कित्येक महिन्यांपासून तमाम भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आता आज उजाडणार आहे. देशभरात लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने तयारी केली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवरून आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात येणार आहे.
वाचा सविस्तर -गो कोरोना गो! राज्यातील 285 केंद्रावर होणार आज लसीकरण
मुंबई- मार्च २०२० पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवर विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शनिवारी १६ जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला प्रारंभ होत आहे. भारत सरकारने ऑक्सफर्ड-अॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला परवानगी दिली. यातील 'कोव्हिशिल्ड' लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास कसा झाला हे आपण थोडक्यात पाहुया...
वाचा सविस्तर -लसीकरणाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या 'कोविशिल्ड' लसीचा प्रवास
पणजी - 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवार (दि.16) ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुदीप संजीव (सुदीप) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
वाचा सविस्तर -51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन