आज दिवसभरात -
- केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यात आज पावसाची शक्यता
नवी दिल्ली - केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच दिल्लीमधील काही भागांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई - राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आजदेखील मराठवाडा, विदर्भा, मध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- आज जाहीर होणार सेटची उत्तरतालिका
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण 15 शहरांमध्ये सेटची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरतालिका आज जाहीर होणार आहे.
- केंद्रीय मंत्री भारती पवार आज पुण्यात
पुणे - केंद्रीय मंत्री भारती पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्या आज पुणे पालिकेत बैठक घेणार आहेत. शहरातील आरोग्यासंबंधी विविध विषयावर त्या आज आढावा घेणार आहेत.
- कालच्या बातम्या -
- तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी, रविवारी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे केरळमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले होते. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी रविवारी सकाळी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
वाचा सविस्तर -Kerala Flood : पावसाचा कहर; आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा
- श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांची गोळ्या घालून हत्या केली असून, तर तिसरा मजूर जखमी झाला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.