- आज दिवसभरात या घडामोडींवर असणार खास नजर
- आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
मुंबई - क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला बुधवारची रात्र तुरुंगातच काढावी लागली आहे. बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन पत्रावर तब्बल पाच तास सुनावणी झाली. मात्र, वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी गुरुवारी ढकलली आहे. यामुळे आर्यनला जेल की बेल हे आज कळणार आहे.
- म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांसाठी आज सोडत
मुंबई - कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत आज, १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
- अमित शाह, देवेंद्र फडणवीस आज गोव्यात
पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज गोवा दौऱ्यावर आहेत. निवडणूक तयारीचा ते आढावा घेणार आहेत.
- सायबर सेलची सीबीआय संचालकांना नोटीस, आज उपस्थित राहण्यास सांगितले
मुंबई - पोलिसांच्या सायबर सेलने सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. सायबर सेलने सीबीआय संचालकांना आज, 14 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ईमेलद्वारे पाठवलेली ही नोटीस अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत पाठवण्यात आली आहे.
- सदाभाऊ खोत यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद
कोल्हापूर - सदाभाऊ खोत यांची आज कोल्हापुरात पत्रकार परिषद होणार आहे. एफआरपीचे पैसे एकरकमी देण्याच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती.
- कालच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर -
शिर्डी(अहमदनगर) - कमी दृष्यमानतेच्या कारणास्तव चेन्नई येथून शिर्डीसाठी आलेले स्पाइस जेटचे विमान थेट मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले आहे. यामुळे चेन्नईहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या 126 भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. कमी दृष्यमानतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
वाचा सविस्तर -चेन्नई येथून शिर्डीसाठी येणारे विमान उतरले थेट मुंबई विमानतळावर; वाचा, काय आहे कारण?
मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज बुधवारी 13 ऑक्टोबरला 2 हजार 219 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 49 मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.