मुंबई - राज्यातील झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या संदर्भात आज शहरातील विविध भागांचा आढावा घेण्यात येणार आहे.
- नाना पटोले यांची पत्रकार परिषद
मुंबई -महाराष्ट्रकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पत्रकार परिषद घेणार आहे. कोरोनाच्या उपाययोजनासंदर्भात ही परिषद घेणार आहे. तसेच राज्यात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर पटोले भाजपवर टीका करण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांची पत्रकार परिषद - मनसुख हिरेन प्रकरणी आणखी एकाला अटक होणार?
मुंबई -मनसुख हिरेन प्रकरणात आज आणखी एकाला अटक होण्याची दाट शक्यता आहे.
मनसुख हिरेन प्रकरणी आणखी एकाला अटक होणार? - अमरावती शहर सकाळी 11 नंतर बंद!
अमरावती -अमरावती शहर सकाळी 11 नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आणि नगरपालिकेने ही कारवाई केली आहे. शहरातील स्मशानभूमींची स्थिती आणि एकूण संख्या याबाबत सद्य परिस्थितीचा संपूर्ण आढावाही घेतल्या जाणार आहे.
अमरावती शहर सकाळी 11 नंतर बंद! - राज्याला दर दिवशी मिळणार 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन
सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यासोबतच रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार येणाऱ्या काही दिवसात राज्यात दर दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्याला दर दिवशी मिळणार 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन - दिल्लीच्या लॉकडाउनचा दुसरा दिवस, बस स्थानकांवर मजुरांची गर्दी
नवी दिल्ली - दिल्लीत सरकारने राजधानीत सोमवारी रात्री 10 वाजेपासून लॉकडाउन घोषित केला आहे. हा लॉकडाउन पुढच्या सोमवारी सकाळपर्यंत असणार आहे. एकच आठवड्याचा हा लॉकडाउन घोषित केला आहे. तहीही स्थलांतरीत मजूर गावाकडे निघाले आहे.
- दिल्लीविरोधात मुंबई इंडियन्सचा रंगणार सामना
मुंबई - आज दिल्ली कॅपीटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना रंगणार आहे. चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे.
दिल्लीविरोधात मुंबई इंडियन्सचा रंगणार सामना