- राष्ट्रीय विज्ञान दिन
आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांना 28 फेब्रुवारी, 1983 रोजी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. यामुळे आजच्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
- आज मन की बात
आज महिन्याचा शेवटचा रविवार आहे. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित करतील.
- केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुदुच्चेरी व तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी अकरा वजता ते कारैकल येथे मतदारांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता भाजप नेत्यांशी बैठक होईल. सायंकाळी पाच वाजता तमिळनाडू येथील जानकीपूरम येथे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दौरा
आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री आज उत्तर प्रेदशातील मेरठच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी ही सभा बोलावली आहे. या किसान महापंचायत सभेला उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार आहेत.
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज वाराणसी दौऱ्यावर आहे. विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीबाबातही ते पक्षाची बैठक घेणार आहेत.
- आज क्षेपणास्त्र होणार लाँच