महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - TODAYS IMPORTANT EVENTS

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

By

Published : Jun 2, 2021, 5:58 AM IST

ज्यालना जिल्ह्यात अलर्ट, ४० किमी वेगाने वारे वाहणार

ज्यालना जिल्ह्यात अलर्ट, ४० किमी वेगाने वारे वाहणार

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी सुमारे ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेमीटरच्या रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ

रिक्षा-टॅक्सी भाडेमीटरच्या रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ

रिक्षा व टॅक्सी भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तोपर्यंत सुधारीत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ६ जून हा दिवस स्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

तेलंगना राज्याचा आज वर्धापन दिन

तेलंगना राज्याचा आज ७ वा वर्धापन दिन

२ जून हा तेलंगना राज्याचा स्थापना दिवस. हे राज्य २०१४ ला आंध्र प्रदेश या राज्यातून वेगळे होऊन एक स्वतंत्र राज्य झाले. देशातील तेलंगना हे २९ वे राज्य निर्माण झाले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत राजकीय स्थितीवर बोलण्याची शक्यता

शिवसेना नेते खासदार संजय राऊत राजकीय स्थितीवर बोलण्याची शक्यता

आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची शक्यता आहे.

भाजपची ओबीसी संदर्भात बैठक होणार आहे.

भाजपची ओबीसी संदर्भात बैठक होणार आहे.

भाजपची बैठक झाल्यानंतर ओबीसीच्या मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details