महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - marathi news

आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

By

Published : Mar 12, 2021, 4:49 AM IST

उद्या एमपीएसी परीक्षेची तारीख जाहीर होणार

एमपीएसीची परीक्षा १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र परीक्षेची नेमकी तारीख (आज) शुक्रवारी १२ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत जाहीर केली जाणार आहे. राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

आमदार प्रशांत बंब यांची औरंगाबादेत पत्रकार परीषद

गंगापूर सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचा आरोप आमदार प्रशांत बंब यांच्यावर करण्यात आला आहे. त्यावर भाष्य करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेतील.

प्रशांत बंब

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची महत्वाची बैठक

कॉंग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आज माध्यमांशी बोलतील.

भाई जगताप

माजी खासदार किरीट सोमैय्या यांची आज पत्रकार परिषद

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या तपासासंदर्भात भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या आज पत्रकार परिषद घेतील.

खासदार किरीट सोमैय्या

आजपासून जळगाव महापालिका हद्दीत सार्वजनिक कर्फ्यू

आजपासून (12 मार्च) जळगाव महापालिका हद्दीत सार्वजनिक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कारण शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

जळगाव महापालिका हद्दीत सार्वजनिक कर्फ्यू

Quad Meet: आज ऑस्ट्रेलिया, भारत, यूएसए, जपान मधील गट 'क्वाड' ची पहिली आभासी बैठक

आज ऑस्ट्रेलिया, भारत, यूएसए, जपान मधील गट 'क्वाड' ची पहिली आभासी बैठक आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ऑस्ट्रेलियन पीएम स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदा सुगा (आज) शुक्रवारी 'क्वाड' बैठकीला येणार आहेत. विशेष म्हणजे चारही देशांच्या क्वाड ग्रुपची पहिली बैठक होणार आहे. चारही नेते या चर्चेत आभासी मार्गाने सहभागी होतील.

'क्वाड' बैठक

दिल्लीः टीएमसी संसदीय पक्ष आज नंदीग्राम घटनेसंदर्भात घेणार निवडणूक आयोगाची भेट

पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या. ममता यांच्या पायाला दुखापत झाली, त्यानंतर त्यांना रात्री कोलकाता येथे उपचारासाठी आणण्यात आले. दरम्यान या प्रकरणी टीएमसी संसदीय पक्ष आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. निवडणूक आयोगाने देखील या प्रकरणाचा अहवाल मागविला होता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

13 मार्च रोजी नंदीग्राम आणि कोलकाता येथे राकेश टिकैत घेणार पंचायत

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर बसलेले शेतकरी आता आपली चळवळ निवडणूक असलेल्या राज्यांत नेणार आहेत. या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत. तेथे शेतकरी नेते आता किसान पंचायत आयोजित करतील. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैट यांचेही मोठे विधान समोर आले आहे. राकेश टिकैत 13 मार्च रोजी पश्चिम बंगालला जाणार आहेत. याठिकाणी नंदीग्राम आणि कोलकाता येथे पंचायत होणार आहे.

राकेश टिकैत

सपा नेते अखिलेश यादव आज रामपूरमध्ये सायकल रॅलीला करणार प्रारंभ

आज सपाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे येत आहेत. खासदार आझम खान यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या सायकल यात्रेचे ते नेतृत्व करतील. सपा चीफ स्वतः 5 किमी सायकल चालवतील. ही सायकल रॅली जोहर विद्यापीठ रामपूर येथून सुरू होईल. तत्पूर्वी अखिलेश यादव येथे जनसभेलाही संबोधित करतील.

अखिलेश यादव

उत्तराखंडः तीरथसिंग रावत मंत्रिमंडळाचा आज होऊ शकतो विस्तार

उत्तराखंड मध्ये तीरथसिंग रावत मंत्रिमंडळाचा आज विस्तार होऊ शकेल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.

तीरथसिंग रावत

ABOUT THE AUTHOR

...view details