मुख्यमंत्र्याच्या रामगिरी समोर भाजपचे जनआक्रोश आंदोलन
नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर भाजपनेा तीव्र आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी केली म्हणत आंदोलन केले. यावेळी आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत सुटका केली.
Big Breaking: बारामतीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांना टोला, बॉम्ब फोडा पण धूर काढू नका
22:12 November 02
नागपूर - मुख्यमंत्र्याच्या रामगिरी समोर भाजपचे जनआक्रोश आंदोलन
18:14 November 02
3 एकराची सोयाबीनची गंजी जळून खाक, निफाड तालुक्यातील नांदगावची घटना
नाशिक ब्रेकिंग
3 एकराची सोयाबीनची गंजी जळून खाक, निफाड तालुक्यातील नांदगावची घटना
निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या तीन एकर शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागली. ती जळून खाक झाल्याने जवळपास 2 ते अडीच लाखांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याने तीन एकर शेतातील सोयाबीनची सोंगणी करून रचून ठेवलेली असता अज्ञात इसमाने सोयाबीनच्या गंजीला आग लावली असता विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने सम्पूर्ण सोयाबीन पीक खाक झाल्याने लाखोंचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे.
15:36 November 02
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे भाजप नेत्यांना भोवले; माजीमंत्री गिरीश महाजनांसह इतरांवर गुन्हा
Jalgaon breaking
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे भाजप नेत्यांना भोवले; माजीमंत्री गिरीश महाजनांसह इतरांवर गुन्हा
जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच कोविडचे निर्बंध देखील सुरू आहेत. अशात भारतीय जनता पक्षाने १ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढून हजारोंचा जमाव एकत्र केला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंदुलाल पटेल, संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13:47 November 02
बॉम्ब फोडा पण धुर काढू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजप नेत्यांना टोला
बारामतीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांना टोला
बारामती (पुणे ) - दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धुर काढू नका. कारण कोरोना अजुन गेलेले नाही.
राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत.
आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवे.
बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही.
13:43 November 02
मुंबईत छट पूजा करण्यास पालिकेची परवानगी
मुंबई - मुंबईत छट पूजा करण्यास पालिकेची परवानगी
- पालिकेने जाहीर केली नियमावली
- कोरोनाच्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यास परवानगी
- भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली होती मागणी
13:40 November 02
'ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी', नागपूरमध्ये भाजपचे आंदोलन
नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर भाजपचे आंदोलन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने 'ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी' असे म्हणत आंदोलन करण्यात आले.
आमदार गिरीश व्यास आणि नागपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
13:23 November 02
मुंबईतील राम मंदिर भागात आगीची घटना
मुंबईतील राम मंदिर भागात आगीची घटना घडली आहे.
राम मंदिरच्या बाहेरील कंपाऊंडला आग लागली आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.
12:29 November 02
बारामतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार - आमदारांची गर्दी
बारामती (पुणे) - अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या इनक्युबेशन, इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्र या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार रोहित पवार व अनेक उद्योगपती उपस्थित आहेत.
12:16 November 02
अनिल देशमुखांना घेऊन ईडीचे अधिकारी विशेष न्यायालयाकडे रवाना
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेऊन ईडीचे अधिकारी विशेष न्यायालयाच्या दिशेने निघाले आहेत.
10:40 November 02
एनसीबीची मोठी कारवाई : विलेपार्ले येथून हेरॉईनचा कोट्यवधीचा साठा जप्त
मुंबई एनसीबीने विलेपार्ले परिसरातून कोट्यवधी रुपयांच्या हेरॉईनचा मोठा साठा जप्त केला आहे. एनसीबी फरार आरोपीचा शोध घेत आहे : एनसीबी
09:47 November 02
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना नवाब मलिकांचे उत्तर
मुंबई - 'मी आयुष्यातील ६२ वर्षे मुंबईत घालवली आहेत. माझे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे सांगण्याची कोणात हिंमत नाही.' असे प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर ड्रग्ज माफिया चालतात, असा आरोप नवाब मलिकांनी सोमवारी केला होता. त्याला फडणवीसांनी कोणाचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, ते उघड करणार असल्याचे सांगत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे ते म्हणाले होते.
09:27 November 02
भाजप आमदार नितेश राणे यांचे सूचक ट्विट
मुंबई - भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अनिल देशमुख यांना "शुभ दिपावली" तर परिवहन मंत्री अनिल परब यांना, "मेरी क्रिसमस" म्हटले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख काल स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडी कार्यालयात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. ईडीच्या या कारवाईनंतर नितेश राणेंनी केलेले हे ट्विट सूचक मानले जात आहे.
06:25 November 02
Big Breaking
- आज पुन्हा इंधन दरवाढ!
- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ
- मुंबईत पेट्रोल 115.85 तर डिझेल 106.62 रुपये प्रतिलिटर