या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट नोव्हेंबरच्या दैनिक कुंडलीत.
मेष : आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
वृषभ : आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे.
मिथुन :आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे.
कर्क :आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. कोर्ट - कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह :आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था असेल. हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल.
कन्या : आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान - सन्मान होतील. वडिलां कडून फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकारी कामे होतील. सरकार कडून फायदा होईल. कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.