आज जागतिक वॅगन दिन (World Vegan Day) आहे. म्हणजेच जागतिक शाकाहारी दिवस. जगभरातील नागरिकांनी शाकाहारी जीवन जगावे, म्हणून दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी जागतिक शाकाहारी दिन साजरा केला जातो. शाकाहारी आहार गेल्या काही वर्षांत अनेकांच्या आवडीचा बनला आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी देखील पूर्णपणे शाकाहारी आहार घ्यायचा निश्चय केला आहे. शाकाहारी लोक त्यांच्या जेवणात मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ वापरत नाहीत. अशा परिस्थितीत, शाकाहारी आहाराच्या फायद्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 01 नोव्हेंबर रोजी जागतिक शाकाहार दिवस (Today is World Vegetarian Day) साजरा केला जातो. history and benefits . World Vegetarian Day .
मुख्य उद्देश : लोकांमध्ये शाकाहार खाण्याची आवड वाढावी आणि त्याच वेळी त्याचा पर्यावरणालाही खूप फायदा होईल, या हेतुने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती केली जाते. शाकाहाराकडे लोकांची आवड वाढवण्यासोबतच हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक शाकाहारी दिनाचा इतिहास :यूके व्हेगन सोसायटीने 1 नोव्हेंबर 1994 रोजी प्रथमच जागतिक शाकाहारी दिवस साजरा केला. व्हेगन सोसायटीची स्थापना 1944 मध्येच झाली. शाकाहारी दिवसाच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त, व्हेगन सोसायटीच्या अध्यक्षांनी दर वर्षी व्हेगन डे हा संस्मरणीय बनवण्यासाठी आणि लोकांमध्ये शाकाहारी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्याची घोषणा केली.
जागतिक शाकाहारी दिवस का साजरा करावा :याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, हा दिवस पर्यावरण वाचवण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी निवडण्यात आला आहे. शाकाहारी अन्न खाल्ल्याने तुम्ही स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवता, पण एक प्रकारे पर्यावरणाचे रक्षणही करत आहात. मांसाहारामुळे अनेक आजार होऊ शकतात. तर कर्करोगासारखे गंभीर आजारही शाकाहारी जीवनशैलीने बरे होऊ शकतात.