महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, वाचा, आजचे राशीभविष्य - लोकांना अचानक धनलाभ संभवतो

30 जानेवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य .

Today Horoscope
आजचे राशीभविष्य

By

Published : Jan 30, 2023, 5:13 AM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत आजचे राशीभविष्य. 30 जानेवारी 2023 .

मेष : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल. मनात नकारात्मक विचार येतील. आर्थिक दृष्टया सुद्धा दिवस मध्यम फलदायी आहे.

वृषभ : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल. आत्मविश्वास वाढेल.

मिथुन :चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा व व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.

कर्क :चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

सिंह :चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कन्या : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया वाढतील.

तूळ : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या गूढ विषयाकडे आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक :चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल.

धनु :चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

मकर : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील.

कुंभ : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रां विषयी सावध राहावे लागेल.

मीन : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळे मन प्रसन्न राहील. स्वकीयांशी जवळीक वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

ABOUT THE AUTHOR

...view details