आजच्या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आजच्या कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. दिलेल्या सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाणार. कोणाला मिळणार जोडीदाराची साथ. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट फेब्रुवारी महिन्याच्या दैनिक कुंडलीत आजचे राशीभविष्य, 20 फेब्रुवारी 2023 .
मेष राशी : आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.
वृषभ राशी : आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन प्रसन्न होईल.
मिथुन राशी : आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणे हितावह राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
कर्क राशी :आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामां पासून शक्य तितके दूर राहावे.
सिंह राशी : आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.