महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या अविवाहितांचे विवाह जुळतील; वाचा राशीभविष्य - कुंडली चंद्र राशीवर

कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 11 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 1:04 AM IST

मेष :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.

मिथुन :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल.

कर्क: आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तना पासून दूर राहणे हितावह राहील.

सिंह :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा व अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी राहतील.

कन्या : आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरी पासून दूर राहणे हितकर होईल.

तूळ :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. प्राप्तीत वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचे विवाह जुळतील.

वृश्चिक :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र - स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.

धनू : आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज कोणतेही धाडस करू नका.

मकर :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावध राहावे.

कुंभ :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.

मीन :आज चंद्र 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : 'या' राशीच्या लव्ह बर्ड्ससाठी खास असेल या महिन्याचा शेवटचा दिवस; वाचा लव्हराशी
  2. Today Horoscope : 'या' राशीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार; वाचा राशीभविष्य
  3. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details