महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना निर्धारित कामात यश मिळेल, वाचा, आजचे राशीभविष्य - आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे

09 फेब्रुवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टीव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य .

Today Horoscope
आजचे राशीभविष्य

By

Published : Feb 9, 2023, 6:16 AM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट फेब्रुवारीच्या दैनिक कुंडलीत आजचे राशीभविष्य.


मेष राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.

वृषभ राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद - विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन - लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.

कर्क राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आर्थिक लाभ व समाजात आदर - सत्कार मिळेल. विरोधकांना पराभूत कराल. कोणाच्या प्रेमात पडाल.

सिंह राशी :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन व अतिविचार संकट निर्माण करतील. स्त्री मित्र मदतरूप ठरतील.

कन्या राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधल्यामुळे सुख व आनंद मिळेल. धनलाभ व प्रवास होईल.

तूळ राशी :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज अडचणींमुळे मनःशांती लाभणार नाही. त्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक राशी :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रांसह सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्‍यांच्या सहकार्यामुळे प्रगती करू शकाल.

धनु राशी :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.

मकर राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्याशी चर्चा तसेच अनावश्यक खर्चापासून दूर राहा.

कुंभ राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. ह्यातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

मीन राशी : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी साठी अनुकूलता लाभेल. दांपत्य जीवनात जवळीक निर्माण होईल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details