मुंबई :आज रविवारी सोन्या-चांदीच्या दरात देशातील काही ठिकाणी घसरण तर काही ठिकाणी वाढ झाली आहे. 500 ते 600 रूपयांची तफावत पहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या किमतीत पहायला मिळत आहे. शनिवारी देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर हे जसे 53,000 च्या आसपास होते. तेच दर आता आज रविवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी 52,000 च्या आसपास पोहचले आहेत. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे देखील दरवाढीचे कारण आहे.
काय आहे आजचा भाव? : आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,240 , 8 ग्रॅम ₹45,728, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,71,600 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,716, 8 ग्रॅम ₹45,344, 10 ग्रॅम ₹57,930, 100 ग्रॅम ₹5,79,300 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,350, मुंबईत ₹52,400, दिल्लीत ₹52,550, कोलकाता ₹52,400, हैदराबाद ₹52,400 आहेत. शनिवारी दि. 4 रोजी देशाच्या प्रुमख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹54,150 होता. मुंबईत ₹52,100 होता. दिल्लीत ₹52,250 होता. कोलकाता ₹53,100 होता. हैदराबादेत हाच सोन्याचा दर हा ₹53,100 आहेत.