महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Cryptocurrency Prices: देशात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का? जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर - बीटकॉईनचे दर काय

सध्या सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत वाढ पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.

Today Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

By

Published : Jan 27, 2023, 6:27 AM IST

मुंबई:क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी होय. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखे नसते. कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. आज बिटकॉइनची किंमत 18,74,086 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,30,236 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,808 रूपये आहे.

क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी:जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत आहे. यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी लाँच करण्यात आली होती. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे.

भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का? व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020मध्ये परवानगी दिली आहे. एप्रिल 2018मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. इतर अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे. इतकेच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे, असे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचे म्हणणे होते. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला केला.

गैरवापर होण्याची शक्यता:हे काही सर्वसामान्य चलन नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा टॅक्स किंवा इतर गोष्टींसाठीचे मूल्य क्रिप्टोकरन्सीने भरता येणार नाही.पण हे चलन आभासी आहे, गोपनीय आहे आणि एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या पत्त्यामार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात. या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो. शिवाय या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचं वा सरकारचं नियंत्रण वा लक्ष नसते. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. पण डिजीटल करन्सी असल्याने फसवले जाण्याची शक्यता उरत नाही.

हेही वाचा: Warrior Expedition In Mumbai: तरुणांना भारतीय लष्कराशी जोडण्यासाठी 'द वॉरियर एक्स्पिडिशन 32/26' ची सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details