महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारवाईचा व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांच्या आले अंगलट, तीन पोलिस निलंबित - व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांच्या आले अंगलट

उत्तर प्रदेशातील संजय प्लेस येथील रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तरुण व युवतींचा कारवाई करतानाचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ काढण्यात आला. नंतर तो व्हिडिओ लीक झाला. त्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे शिस्तभंगाची करवाई म्हणून एसएसपींनी तीन पोलिसांवर कारवाई केली. तीन पोलिसांना निलंबीत केले.

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने तीन पोलिस निलंबित
आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने तीन पोलिस निलंबित

By

Published : Aug 12, 2022, 3:45 PM IST

आग्रा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील संजय प्लेस येथील रेस्टॉरंटच्या तळघरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. याबाबत पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या प्रकरणानंतर एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी तीन हवालदारांना निलंबित केले आहे. त्यांची विभागीय चौकशीही सुरू झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ 15 दिवस जुना आहे. शहरातील अशा सर्व रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये असाच धंदा सुरू असल्याचा आरोप आहे. संजय प्लेस शू मार्केटमध्ये कॅफे हाऊस नावाचे रेस्टॉरंट आहे. त्याच्या तळघरात केबिनमध्ये चुकीच्या गोष्टी सुरू असल्याची तक्रार होती. याबाबत माहिती अशी की, कॅफे चालकाच्या वतीने तरुण तरुणींना तासाला तीनशे रुपये दराने केबिन दिल्या जात. हरिपर्वत पोलिस ठाण्याचे मुख्य हवालदार रणजीत, हवालदार सौरभ कुमार आणि व्हीआरव्ही कॉन्स्टेबल ज्ञानेंद्र सिंह यांनी 27 जुलै रोजी येथे छापा टाकला होता. पोलिसांनी पुरावा म्हणून छापेमारीचा व्हिडीओ मोबाईलवरून बनवला. पोलिसांनी केबिनचे पडदे हटवले असता केबिनमध्ये तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. घटनास्थळावरून इतर सर्व साहित्यही सापडले.

बुधवारी, १० ऑगस्ट रोजी संजय प्लेस येथील कॅफे हाऊसवर टाकलेल्या छाप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्यांची विनवणी करत आहेत. तरुण तरुणी रडण्यासोबतच तोंड लपवत आहेत असे या व्हिडिओत दिसत होते. त्यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ज्यामध्ये पहिला प्रश्न होता की, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांच्यासोबत एकही महिला पोलीस का नव्हती. ही माहिती एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तीन पोलिसांना तत्काळ निलंबित केले. एसएसपीने निवेदनात म्हटले आहे की, व्हिडिओ लीक केल्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे या तिन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा - 15 कोटींच्या मालमत्तेसाठी पती आणि मुलाने तयार केले बनावट मृत्यू प्रमाणपत्र, पाच वर्षांनी कट आला उघडकीस

ABOUT THE AUTHOR

...view details