बेंगळुरू : कर्नाटकात ISIS च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेटच्या ( ISIS ) कारवाया त्यांना पुढे करायच्या होत्या, असा पोलिसांचा दावा आहे. टोळीचे सदस्य राज्यभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
शिवमोग्गा येथील सिद्धेश्वर नगर येथील रहिवासीसय्यद यासीन (21), मंगळूर येथील रहिवासी माजी मुनीर अहमद (22) यांना आज अटक करण्यात आली. तिसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी शिवमोग्गा येथील रहिवासी शारिक, माझी आणि सय्यद यासीन यांच्याविरुद्ध आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस एफआयआरनुसार या टोळीचे सदस्य भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने कट रचत होता.
गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले, 'तिघांचेही आयएसशी संबंध होते.' त्यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू आहे. ते मंगळुरुशी संबंधित असलेल्या शिवमोग्गा आणि तीर्थहल्ली येथील आहेत. त्याचवेळी, एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की सय्यद यासीन आणि माजी मुनीर अहमद यांना अटक करण्यात आली आणि त्यांची चौकशी करून शिवमोग्गा न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.