मेदिनीपूर (पश्चिम बंगाल) : ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये झालेल्या तिहेरी रेल्वे अपघात झाला यात 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण आपआपल्या गावी जात होते पण कोणालाच माहिती नव्हते त्यांच्यासोबत काळ असा हल्ला करणार आहे. या रेल्वेमधील एकाही प्रवाशांच्या मनात असे काही होईल, अशी कल्पना नव्हती. या रेल्वे अपघातामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अपघात झाला तेव्हा काय स्थिती होती याची आपबीती एका प्रवशाने सांगितली आहे.
एकाच कुटुंबातील तिघे वाचले : ओडिशातील रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्य देवकृपने बचावले आहेत. अपघातातून बचावत हे तिघेजण पश्चिम बंगालमधील आपल्या घरी सुखरुप पोहोचले. सुब्रतो पाल, देबश्री पाल हे पती-पत्नी आणि त्यांचे मूल या भीषण अपघातातून बचावले आहेत. हे तिघेही पश्चिम बंगालमधील महिसादल जिल्ह्यातील , पूरबा मेदिनीपूर तालुक्यातील असलेल्या मालुबासन गावचे रहिवासी आहेत. दोन्ही नवरा-बायको आपल्या मुलाला चेन्नईमधील डॉक्टरकडे उपचारासाठी नेत होते. त्याचदरम्यान त्यांच्या रेल्वेचा अपघात झाला.
सांगितली आपबीती : रेल्वेच्या अपघातातून बचावल्यानंतर सुब्रतो पाल यांनी माध्यमाला सांगितले की, या घटनेनंतर मला नवीन जीवन मिळाल्यासारखे वाटत आहे. "आम्ही काल खरगपूर स्टेशनवरून चेन्नईला निघालो होतो. बालासोर स्टेशन सोडल्यानंतर आमच्या रेल्वेला धडक बसली. त्यानंतर रेल्वेचा डब्बा हा धुराने भरला. मला दुसरे कोणीच दिसत नव्हते. काही वेळानंतर तेथील स्थानिक माझ्या मदतीला आले. त्यांनी मला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. एखाद्या देवाने मला दुसरे जीवनदान दिले असे मला वाटत असल्याचे सुब्रतो म्हणाला.