महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lakshmi Pujan : यंदा लक्ष्मीपूजन साजरे करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी; होईल फायदा

24 ऑक्टोबर, सोमवार रोजी लक्ष्मी पूजन (celebrating Lakshmi Puja) आहे. हिंदू धर्मातील पवित्र आणि अत्यंत महत्वाचा सण मानल्या जाणाऱ्या लक्ष्मी पूजनाचे काही नियम व श्रध्दा (remember these things fruit of worship will be doubled) आहेत. काय आहेत ते नियम जाणुन घेऊया. ( Lakshmi Pujan)

Diwali 2022
लक्ष्मीपूजन

By

Published : Oct 9, 2022, 4:29 PM IST

Updated : Oct 23, 2022, 9:11 PM IST

हिंदू धर्मातील दिवाळी हा फार महत्वाचा सण आहे. लक्ष्मीपूजन (celebrating Lakshmi Puja) हे आश्विन अमावास्येला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर मुहूर्तावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. तसेच व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नवीन खाते वहीची पूजा देखील (remember these things fruit of worship will be doubled) यादिवशी करतात.Diwali Celebration

कधी आहे लक्ष्मीपूजन :आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. यंदा लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर, सोमवार रोजी साजरे केले जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गा बरोबरच सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचा असतो.

पुरणाचा नैवेद्य : लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सर्व मंडळी विविध कामे करण्यात मग्न असतात. सायंकाळी घरात सगळीकडे पणत्या लावुन हा सण साजरा करतात. तर एका लाकडी पाटावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. त्यावर श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती ठेऊन त्यांची मनोभावाने पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे. या दिवशी महाराष्ट्रीयन कुटूंबात पुरणाचा किंवा दुधाच्या खिरचा नैवेद्य देवी लक्ष्मीला दाखविल्या जातो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे :दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.

पूजेत आवश्यक गोष्टी :तसेच, पूजेच्या वेळी शांत चित्ताने पूजा करावी. माता लक्ष्मीची आरती करावी. पूजेत झाडू, अक्षिदा, कमळाचे फुल, कवड्या, ऊस, शिंगाडे, मिठाई किंवा दुधाची खिर, झेंडूची पिवळी फुले, सुपारी, लाल धागा, विड्याची पाने, माता लक्ष्मी व गणपतीचे चित्र असलेला चांदिचा शिक्का, श्री यंत्र, धानाच्या लाह्या आणि त्या ऋतु मध्ये मिळणारी पाच फळे या गोष्टी आवर्जुन ठेवाव्या.

लक्ष्मीपूजनाचे काही नियम : लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नका. लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.Diwali Celebration 2022

Last Updated : Oct 23, 2022, 9:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details