हैदराबाद -‘विश्वसुंदरी 2021' (Harnaaz Sandhu wins Miss Universe 2021) किताब मिळवून हरनाझ संधूने आपल्या भारतीयांची मान पुन्हा एकदा ताठ केली. तब्बल 21 वर्षांनी हा जल्लोष साजरा करण्याचं भाग्य भारतीयांच्या पदरी पडलं. ‘मिस युनिव्हर्स 2021’ ( Miss Universe 2021 winner Harnaaz Sandhu ) च्या अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत अनेक कठीण मार्ग पार पाडावे लागतात. सौंदर्य स्पर्धेत विजेता होण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नाही. तर त्या व्यक्तीची समज, ज्ञान आणि हजरजबाबीपणा सुद्धा महत्त्वाचा असतो.
‘मिस युनिव्हर्स 2021’ (Miss Universe 2021) किताब अशा सुंदरीच्या डोक्यावर चढवला जातो, जी शेवटच्या प्रश्नाचं आकर्षक आणि समर्पक उत्तर देते. अख्ख्या जगासमोर आत्मविश्वासाने प्रश्नाचं योग्य उत्तर देत हरनाझ संधूने (Miss Universe 2021 winner Harnaaz Sandhu ) मुकुट आपल्याकडे खेचून घेतला आहे.
विश्वसुंदरीच्या अंतिम फेरीत आलेल्या तीन सौदर्यंवतींना एक प्रश्न विचारण्यात आला. आजच्या काळात दडपणाचा सामना करणार्या तरुणाईला काय सल्ला द्याल?, यावर हरनाझने मनाला भिडणारं उत्तर दिलं.
यावर हरनाझ म्हणाली, की 'आजच्या तरुणाईवरील सर्वात मोठे दडपण म्हणजे त्यांचा स्वत:वरचा विश्वास. तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहात, हीच गोष्ट तुम्हाला खास बनवते. स्वत:ची इतरांसोबत तुलना करणं थांबवा. जगभरात जे काही चालले आहे, त्याबद्दल बोलणं खूप महत्त्वाचे आहे. बाहेर पडा, स्वतःसाठी बोला. कारण, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच मी आज इथे उभी आहे. या उत्तराने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. या प्रश्नाच्या उत्तरांमुळे हरनाझ पहिल्या तीनमध्ये अव्वल ठरली आणि तिला विजेता घोषित करण्यात आले.
टॉप-5 फेरीत विचारला होता हा प्रश्न -
तर याआधी टॉप-5 फेरीत स्पर्धकांना हवामान बदलाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. अनेक लोकांना वाटते की क्लायमेट चेंज ही मोठी समस्या आहे, तुला याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरनाझ म्हणाली, 'हवामान बदल ही गंभीर समस्या आहे. आताची परिस्थितीप पाहून मला याविषयी काळजी वाटते. त्यावर आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. हे सर्व आपल्या निष्काळजीपणामुळे होत आहे. बोलण्यापेक्षा कृती करण्याची ही वेळ आहे, असे मला वाटते. आपली प्रत्येक कृती ही पर्यावरणाला वाचवू शकते. त्यामुळे पश्चात्ताप आणि चुका सुधारण्यापेक्षा आधीच आधीच काळजी घेतलेली कधीही उत्तम असते, असे उत्तर देत हरनाझ टॉप 3 म्हणजेच अंतिम फेरीत पोहचली.